drama
drama sakal
पुणे

शनिवार-रविवारच्या प्रयोगांनी तारले निर्मात्यांचे आर्थिक गणित

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बालगंधर्व असो किंवा यशवंतराव चव्हाण, टिळक स्मारक असो वा भरत नाट्य मंदिर, पुणे शहरातील (Pune City) प्रत्येक नाट्यगृहामध्ये (Drama) सध्या वीकेंड (Weekend) अर्थात शनिवार-रविवारी भरगच्च कार्यक्रमांची (Event) रेलचेल आहे. नाट्य प्रयोग आणि संगीत मैफलींच्या बुकिंगने जवळपास सर्वच नाट्यगृहांमधील दिवसभरातील स्लॉट भरले आहेत. सध्या ५० टक्के उपस्थितीच्या बंधनाने उत्पन्नाची नाडी मंदावली असताना वीकेंडच्या प्रयोगाची रामबाण मात्रा निर्मात्यांना तारून नेत आहे.

शहरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नाट्यगृहांमध्ये आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी आहे. त्यामुळे आधीच उत्पन्नात घट होते. त्यात आठवड्यातील कामाच्या दिवसांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम लावल्यास ५० टक्के प्रेक्षकही उपस्थित नसतात. परिणामी खर्च अधिक आणि उत्पन्न कमी, अशी वेळ निर्मात्यांवर येते. याउलट शनिवार व रविवारी कार्यक्रमांचे, नाटकांचे प्रयोग लावल्यास प्रेक्षकही गर्दी करतात.

अशी आहे स्थिती

  • गेल्या काही दिवसांमध्ये वीकेंडचे बहुतांश प्रयोग हाउसफुल्ल होत असल्याचा निर्मात्यांना अनुभव

  • म्हणूनच वीकेंडला अधिकाधिक प्रयोग करून खर्चाचा ताळमेळ जुळवण्याकडे निर्मात्यांचा कल

  • याशिवाय, कलाकारांची उपलब्धता, हेही वीकेंडला आयोजित होणाऱ्या प्रयोगांमागील एक महत्त्वाचे कारण

  • नाट्यगृहे बंद असल्याच्या काळात अनेक कलाकार सिनेमा व मालिकांच्या चित्रीकरणात व्यग्र झाले होते

  • नाट्यगृहे खुली झाल्यावर दोहोंचा मेळ साधण्यासाठी आठवडाभर चित्रीकरण व आठवड्याच्या शेवटी नाट्यप्रयोग, असे नियोजन

आगामी वीकेंड जोरदार

येत्या आठवड्याच्या अखेरीसदेखील हेच चित्र आहे. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’, ‘अमर फोटो स्टुडिओ’, ‘तिला काही सांगायचंय’, ‘अ परफेक्ट मर्डर’ आदी व्यावसायिक नाटके, ‘आयुष्यावर बोलू काही’, ‘नाइन्टीज हटके’ हे सांगीतिक कार्यक्रम येत्या शनिवारी व रविवारी शहरातील विविध नाट्यगृहांमध्ये सादर होणार आहेत. कोरोनाचे निर्बंध कायम असेपर्यंत हाच कल कायम असेल, अशी चिन्हे आहेत.

संचारबंदीमुळे रात्रीचे प्रयोग बंद

एरवी २६ जानेवारीसारख्या सार्वजनिक सुट्टीच्या आदल्या दिवशी, तसेच शुक्रवारी रात्री ९-९.३० च्या सुमारास आयोजित नाट्यप्रयोगांना व सांस्कृतिक कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळतो. हे प्रयोग रात्री ११.३०-१२ पर्यंत संपतात. परंतु, दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने रात्री उशिरापर्यंत प्रयोगाला थांबण्याची प्रेक्षकांची तयारी असते, मात्र सध्या रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे या प्रयोगांचे आयोजन थांबले आहे. याही कारणामुळे आता वीकेंडच्या प्रयोगांखेरीज दुसरा पर्याय निर्मात्यांसमोर नाही, असे नाट्य व्यवस्थापक समीर हंपी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT