पुणे

मंचरला आठवडे बाजार भरणार तेही दोन दिवस!

डी.के वळसे-पाटील

मंचर : आठवडे बाजार सुरु करण्यास पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या परवानगीचे मंचर ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी स्वागत केले आहे. गर्दीच्या विभाजनासाठी रविवार प्रमाणेच बुधवारीही आठवडे बाजार भरविण्याचा निर्णय झाला आहे.आंबेगाव तालुक्यातील मंचरचा सर्वात मोठा आठवडे बाजार आहे.

गांजाळे म्हणाले, हातावरचे पोट असणाऱ्यांना रोजगार मिळणार आहे. मंचरला आठवडे बाजार रविवारी भरत होता. पण गर्दीचे विभाजन व्हावे. या उद्देशाने दर रविवारी व बुधवारी आठवडे बाजार भरविला जाणार आहे. दोन एकर जागेत आठवडे बाजार भरतो. लहान मोठे एक हजार ४५० व्यापारी विविध प्रकारच्या वस्तू,भाजीपाला, पदार्थ, शेती अवजारे, शेतीमाल विक्रीसाठी घेऊन येतात.

तसेच आंबेगाव तालुक्यातील १०४ गावातील नागरिक, लगतच्या खेड, जुन्नर व शिरूर तालुक्यातील जवळपास ७० गावातील नागरिक आठवडे बाजाराला हजेरी लावतात. व्यापाऱ्यांचेही बुधवारी व रविवारी विभाजन केले जाईल. त्यामुळे गर्दी विभागून जाण्यास मदत होईल. आठवडे बाजारात येणारे व्यापारी व नागरिक यांच्या तापमानाची तपासणी थर्मामीटरद्वारे केली जाईल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे सर्वांना बंधनकारक राहील. सोशल डिस्टन्सच्या वापराची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी ग्रामपंचायतिच्या कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले आहे. आठवडे बाजाराचे ठिकाण वेळोवेळी निर्जंतुकीकरण केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT