पुणे

कोरोनाच्या लढाईत घटले आयुक्त शेखर गायकवाड यांचे वजन

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यावर झडप घातलेल्या कोरोना संकटाशी दोन हात करीत त्याला परतवून लावण्याचा इरादा केलेले पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांचे शारीरिक वजन पाच किलोंनी घटले. गेल्या दीड महिन्यांत गायकवाड यांचे वजन ७३ वरून ६८ किलोपर्यंत उरतले आहे. या मोहिमेत प्रचंड धावपळ होऊनही अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी स्वत:ला जपले तरीही त्यांचे वजन दोन किलो कमी झाले आहे. नेहमीच आपला 'फिटेनस' फंडा जपणारे उपायुक्त राजेंद्र मुठेही उतरले असून, त्यांचे वजन आठ किलोंनी कमी झाले आहे. शिडशिडीत बांध्याच्या डॉ. संजीव वावरे हेही सहा किलोंनी कमी झाले आहेत.

आयुक्तपदाची जबाबदारी येऊन दीड महिना होताच गायकवाडांना कोरोनाशी दोन हात करावे लागले. याआधी रोजच्या खाण्यापिण्याची प्रचंड काळजी घेणाऱ्या गायकवाडांचे या काळात 'ब्रेक फास्ट'पासून लंच, डीनर आणि अगदी झोपेचेही टायमिंग चकले आणि त्याचा परिणाम शरीरावर झाला. याआधी त्यांचे वजन ७२.८ किलो होते; ते कमी होऊन आता ६८ किलो झाले आहे. गडबडीत त्यांचे वजन किती कमी झाले असावे ? हा प्रश्न त्यांना पाहणाऱ्या हमखास पड़तो. तो प्रश्न विचारला आणि गायकवाड म्हणाले, मी साडेचार -पाच किलोंनी कमी झालोय '.
गायकवाडांपाठोपाठ रोज किमान १५ ते १६ तास ऑफिस आणि कंटेन्मेंट झोनपासून हॉस्पिटल, रुग्णांसाठी नवे उपाय, विलगीकरण कक्ष, त्याच्या तयारीच्या पाहणीत रोज चार-पाच तास घालविणाऱ्या रुबल अग्रवाल यांचे वजनही दोन किलोनी घटले आहे..

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सलग सव्वादोन महिने एकही सुट्टी न घेतलेले आणि रुग्ण, संशयित वाढण्याच्या शक्यतेने त्यांच्यासाठी उपायांची जबाबदारी असलेल्या मुठेचा मॉर्निंग वॉक, स्विमिंग आणि सुट्टीच्या दिवशी हिंडण्याभर असतो. त्यातून ते अधिकच 'मेटेंन' आहेत, पण आता त्यांचे वजन ७७ वरून ७० पर्यंत घटले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ. वावरे प्रत्यक्षात डोळ्यापुढे आले की वाटते यांचे वजन किमान पंधरा किलो कमी झाले असावे ? इतका ताण असलेल्या डॉ. वावरेंचे वजन ६६ होते आता ६० असल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यात कोरोनाने धकड मारली असली त्याआधी पंधरा दिवसांपासून महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली होती. कोरोना चे आक्रमण रोखण्याच्या हेतून आयुक्त गायकवाड यांच्यासह अग्रवाल आणि त्यांची सारी टीम उपाय आखत होती आणि ते अमलात आणायची तयारी करीत होते. तेवढ्यात नऊ मार्चनंतर आतापर्यंत कोरोनाने पावणेचार हजार पुणेकरांना आपल्या आवाक्यात घेतले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आकडे वाढत चालल्याने यंत्रणा हबकली आणि पुणेकरांच्या बचावासाठी यशस्वीरित्या पावले टाकू लागली. या लढाईत गायकवाड यांच्यापासून सगळ्या अधिकाऱ्यांच्या अगदी सापताहिक सुट्याही रद्द झाल्या. त्यामुळे गेली अडीच-पावणेतीन महिने ही मंडळी रोज सलग १६ ते १८ तास झटत आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या रुटीनवर होत असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT