Weightlifter Sarika Shingare got a help due to Sakal 
पुणे

'सकाळ'मुळे वेटलिफ्टर खेळाडू सारिका शिनगारेला मिळाला मदतीचा हात

महेंद्र शिंदे

कडूस : खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झालेल्या परंतु घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे स्पर्धेचा खर्च भागवू शकत नसलेल्या रौन्धळवाडी (ता.खेड) येथील वेटलिफ्टर खेळाडू सारिका शिनगारे हिच्या मदतीचे आवाहन 'सकाळ'ने चार महिन्यांपूर्वी केले होते. 'सकाळ'च्या आवाहनाला चार महिने होऊन गेले, पण मदतीचा ओघ अजूनही सुरूच आहे. रविवारी (ता.21) पिंपरी चिंचवड येथील नवसंकल्प फाउंडेशनने दहा हजारांचा धनादेश सारिकाच्या हातात सुपूर्द केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

''झोपडीतल्या सारिकाला जिकायचंय; पण ....''या शीर्षकाखाली 24 फेब्रुवारी 2020 रोजी 'दै.सकाळ'ने खेड तालुक्यातील उदयोन्मुख महिला वेटलिफ्टर खेळाडू सारिका प्रभाकर शिनगारे हिच्याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. वेटलिफ्टिंगच्या खेळासाठी भुवनेश्वर येथे खेळल्या जाणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी सारिकाची निवड झाली होती, परंतु घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे स्पर्धेचा आवश्यक खर्च भागवू शकत नव्हती. आर्थिक टंचाईमुळे मैदान सोडून देण्याच्या विचारात असलेल्या या गुणी खेळाडूला आर्थिक मदतीचे आवाहन 'सकाळ'ने केले होते. 'सकाळ'च्या आवाहनानंतर सारिकाला मदतीचा ओघ सुरू झाला.

जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील व मित्र परिवाराने त्याच दिवशी चाळीस हजार रुपयांची मदत दिली. समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, संघटनांनी पुढाकार घेत तिच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा केली आहे. आतापर्यंत लाखो रुपयांची मदत या गुणी खेळाडूला मिळाली आहे. या मदतीचा ओघ अजूनही सुरूच आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

रविवारी पिंपरी चिंचवड येथील नवसंकल्प फाउंडेशन तर्फे दहा हजारांचा धनादेश देण्यात आला. रौन्धळवाडी येथील घरी जाऊन फाउंडेशनचे अध्यक्ष अँड.गणेश शिंदे यांनी हा धनादेश सारिकाकडे सुपूर्द केला. यावेळी फाउंडेशनचे गणेश फिरोदिया, विशाल म्हेत्रे, सतीश सूर्यवंशी, सारिकाची आई व भाऊ मंगेश उपस्थित होते. 


परिस्थीवर मात करत सारिका करतेय चमकदार कामगिरी
आठवीत असताना सारिकाचे पितृछत्र हरपले आहे. जमीन नाही. मासेमारीचा पारंपरिक व्यवसाय हाच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आधार. भामा आसखेड धरणाच्या बॅक वॉटरजवळ आई आणि भावासोबत ती राहते. तिने आतापर्यंत वेटलिफ्टिंगच्या शेकडो महत्वाच्या स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे. राज्यस्तरीय शालेय स्पर्धा, पुणे व पिंपरी चिंचवड महापौर चषक स्पर्धा, असोसिएशनची राज्यस्तरीय स्पर्धा, पाटणा येथील राष्ट्रीय स्पर्धा, तिरुनवेल्ली (तामिळनाडू) येथील अखिल भारतीय (राष्ट्रीयस्तर) आंतरविद्यापीठ स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. चमकदार कामगिरीची प्रशस्तीपत्रके आणि चषकांचा घरात खच पडला आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Special Envoy Sergio Gor: ट्रम्प यांचे विशेष दूत सर्जियो गोर यांचं मोठं विधान म्हणाले, ''भारत आमचा धोरणात्मक भागीदार अन्... ''

IND vs WI Test Series: केएल राहुलकडे कसोटी संघाचे नेतृत्व, श्रेयस अय्यरचे पुनरागमन; वेस्ट इंडिजविरुद्ध अशी असेल टीम इंडिया

Modem Balakrishna : कोण होता मॉडेम बालकृष्ण? तब्बल एक कोटींचा होता इनाम, खात्मा झाल्याने नक्षलवाद्यांना मोठा झटका

Pune News : तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला मरेपर्यंत जन्मठेप

Nepal Protests : नेपाळमधील आंदोलनानंतर विमानसेवा सुरू, पर्यटकांचा मायदेशी परतीचा प्रवास

SCROLL FOR NEXT