पुणे

दिखाऊ योजना गुंडाळण्याच्या पालिका प्रशासनाच्या हालचाली 

सकाळवृत्तसेवा

पुणे - आपला अजेंडा रेटण्यासह लोकांना खूष करण्याच्या उद्देशाने महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने निरनिराळ्या कल्याणकारी योजना मांडल्या; पण अंमलबजावणीच्या पातळीवर मात्र त्या पुढे सरकत नसल्याने या दिखाऊ योजना गुंडाळण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. 

अंदाजपत्रकात पायाभूत सुविधांना प्राधान्य देतानाच कल्याणकारी योजनांची खैरात केली जाते. परिणामी, अंदाजपत्रकातील आकडे भरमसाट फुगविले जातात. अशा योजनांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होते. काही अधिकारी-कर्मचारी आपापल्या परीने "अर्थ'पूर्ण उद्देशाने योजना लाभार्थ्यांपर्यंत पोचवितात. त्यापासून खरे लाभार्थी वंचित राहतात. प्रामुख्याने समाज विकास आणि नागरवस्ती विभागाच्या योजनांचा आजतागायत हिशेब मांडला जात नसल्याने या खात्यांच्या कारभाराबाबत नेहमी चर्चा होते. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या अंदाजपत्रकातील योजनांचा आढावा घेतल्यानंतर कठोर पावले उचलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी काही खातेप्रमुखांना कामांचा अहवाल मांडण्याचा आदेश देण्यात आला आहे. 

दरम्यान, आरोग्य खात्याच्या योजनांमध्ये गोंधळ होत असल्याच्या तक्रारी आहेत. रुग्णांना देण्यात येणाऱ्या सवलती त्यांच्यापर्यंत पोचत नसल्याच्या तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात येत आहेत. त्यामुळे योजना आणि त्यांचे निकष यावरही आता बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

उधळपट्टी रोखणार 
महिला, युवतींसह अन्य घटकांच्या सक्षमीकरणाच्या नावाखाली, तसेच अन्य योजनांवर होणारी पैशांची उधळपट्‌टी रोखण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलले आहे. त्याआधी गेल्या पाच वर्षांमधील योजनांचा आढावा घेण्यात येणार असून, लाभार्थी त्याचे निकष, प्रत्यक्ष कार्यवाही आणि परिणाम याबाबी तपासण्यासाठी यंत्रणा नेमली जाणार आहे. 

ज्या योजना ठराविक घटकांपुरत्या आहेत, त्यांची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षित आहे. मात्र, तसे होत नसल्यास त्याची सविस्तर माहिती घेण्यात येईल. त्यानंतर त्या योजनेसाठी किती निधी द्यायचा, याचा विचार केला जाईल. 
-राजेंद्र निंबाळकर, अतिरिक्त आयुक्त 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT