पुणे

एकवाक्यतेचा अभाव; पक्षीय ध्रुवीकरण

CD

काय चाललंय राजकीय पक्षांत : लोगो

गेल्या दोन वर्षांत अर्थात २०२४ व २०२५ या वर्षांत लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. आगामी तीन वर्षांत मोठ्या निवडणुका नाहीत. २०२९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुका मतदारसंघ पुनर्रचनेनुसार होतील. सध्या मतदार पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत प्रत्येक राजकीय पक्षाची कसोटी लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर पातळीवर पक्षांच्या गोटात काय सुरू आहे, याची वस्तुस्थिती मांडणारी ‘काय चाललंय राजकीय पक्षांत’ ही वृत्तमालिका आजपासून...

पीतांबर लोहार : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २२ : महापालिकेतील काही जागांसाठी ऐनवेळी उमेदवार आयात करून भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता मिळवली. पण, गेल्या चार महिन्यांत वादग्रस्त ठरलेले काही निर्णय आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नसलेली एकवाक्यता, यामुळे जनहिताऐवजी स्वहिताकडे पक्ष वळला आहे का? २०१७ ते २०२२ या कार्यकाळाप्रमाणे पुणे-मुंबई महामार्गाच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे असे पक्षीय ध्रुवीकरण झाले आहे का? अशी शंका उपस्थित होत आहे.


पिंपरी चिंचवड शहर एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. तो राष्ट्रवादी काँग्रेसने ताब्यात घेऊन महापालिका सलग १५ वर्षे ताब्यात ठेवली. मात्र, २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अनुक्रमे केंद्र व राज्यात भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापन केली आणि तोच कित्ता पिंपरी चिंचवड महापालिकेतही गिरवला. २०१७ मध्ये एकहाती सत्ता मिळवली. आताही ‘अगली बार, सौ पार’ म्हणत निवडणूक लढवली. त्याला अपयश आले, मात्र १२८ पैकी एका अपक्षासह ८५ जागा मिळवून पुन्हा सत्ता स्थापन केली. पण, कारभाऱ्यांसह महापालिकेतील पदाधिकाऱ्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे सभागृहासह बाहेरही वारंवार दिसत आहे. विशेष म्हणजे, निष्ठावंत कार्यकर्ते आणि निवडणुकीपूर्वी ‘आयात’ केलेल्यांमध्ये मतभेद होत आहेत. अशा प्रकारांसह पक्षाचे दोन सत्ताकेंद्रांमध्ये (आता चार) विभाजन होण्यापासून रोखण्याची आवश्यकता आहे.

महापालिका निवडणुकीनंतर
- लोणावळा येथे कार्यकर्ता- पदाधिकारी मार्गदर्शन शिबिर, सदस्य नोंदणी सुरू
- मतदार पुनरीक्षण कार्यक्रमात निवडणूक यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना सहकार्य
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तपपूर्ती कार्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे
- विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी सदस्य नोंदणी मोहीम
- महिला, युवा अशा विविध मोर्चांच्या कार्यकारिणी नियुक्तीवर भर
- पक्षवाढीसाठी महापालिकेच्या ३२ प्रभागांमध्ये संपर्क दौरे प्रारंभ
- मंडलप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, बूथप्रमुखांच्या (मतदान केंद्र) बैठकी
- डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जयंतीनिमित्त ५० ठिकाणी कार्यकर्ता शिबिर
- जागतिक योग दिनानिमित्त ६४ ठिकाणी योग शिबिरे
- पक्षाच्या १४ मंडलांत कार्यकर्त्यांसाठी निवासी शिबिरे
- महापालिकेच्या ३२ प्रभागांची आठऐवजी १० क्षेत्रीय कार्यालयांत विभागणी

काय करायला हवे
- महापालिकेतील नवनिर्वाचित नगरसदस्यांना प्रशिक्षण आवश्यक
- नगरसदस्यांसह पदाधिकाऱ्यांना सभाशास्त्राचे धडे हवेत
- एखाद्या मुद्द्यावर मतभेद असले, तरी जाहीर प्रकटीकरण नसावे
- पक्ष व महापालिकास्तरीय पदाधिकाऱ्यांत एकवाक्यता हवी
- अन्य पक्षांतून आलेल्यांना पक्षाच्या नियमावलीबाबत मार्गदर्शन
- सर्वसामान्यांचे प्रश्‍न, अडचणी सोडवण्यासाठी बूथस्तरावर व्यवस्था हवी
- राज्य सरकारच्या निर्णयानुसार महापालिकेत, तसेच क्षेत्रीय कार्यालयांत
समित्या स्थापन करून त्यांत स्वीकृत सदस्यांची नियुक्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIFA World Cup 2026: पोटासाठी कारखान्यात मजुरी अन् स्वप्नासाठी फुटबॉल... दुहेरी लढाई लढणारा पोरगाच ठरला जर्मनीचा 'तारणहार'

Afghanistan Earthquake: अफगानिस्तान पुन्हा हादरलं! पूर्व प्रांतात ५.२ रिश्टर स्केलच तीव्रतेचा भूकंप; नैसर्गिक आपत्तीचा इशारा

कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत १४ विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू; बचावकार्य युद्धपातळीवर, उपमुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

One Nation One Ration : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! आता देशभरात कुठूनही घेता येणार रेशन; 'या' लोकांना होणार फायदा

अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलं पत्र; RTI कायद्यातील दुरुस्तीविरोधात आक्रमक

SCROLL FOR NEXT