prostitution 
पुणे

वेश्‍या वस्तीतील किती टक्के महिला आरोग्य सुविधांपासून वंचित आहेत? व का?

सकाळवृत्तसेवा

पुणे - वर्षानुवर्षे समाजाकडून हीनतेची भावना सहन करत आलेला समाजघटक म्हणजे देहविक्री करणाऱ्या महिला! समाजानेच ज्यांचे माणूस म्हणून अस्तित्वच मान्य केले नाही, त्या समाजघटकाकडे राज्यसंस्थेनेही दुर्लक्षित केले आहे. कायदेशीरदृष्ट्या स्वतःचे अस्तित्वच त्यांना सिद्ध करता येणार का, हा मोठा प्रश्‍न आहे. जनआरोग्य योजनेचे सरकारी ओळखपत्र नसल्याने वेश्‍या वस्तीतील ९८ टक्के महिला आरोग्य सुविधांपासून वंचित असल्याची धक्कादायक बाब सर्वेक्षणात समोर आली आहे.

‘सर्वोजना प्रकल्पां’तर्गत वेश्‍या वस्तीतील महिलांमध्ये लैंगिक व प्रजननविषय आरोग्य सर्वेक्षण, ‘सहेली’ संघातर्फे करण्यात आले होते. त्यामध्ये या महिलांसदर्भात काही महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आले आहेत. संघाच्या संचालिका तेजस्वी सेवेकरी म्हणाल्या, ‘‘देशात वेश्‍या व्यवसाय जरी गुन्हा नसला तरी एकांगी कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे त्या व्यवसायातील महिलांचे गुन्हेगारीकरण होत आहे. पर्यायाने त्या महिलांना आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागते. वेश्‍या व्यवसायात असलेल्या महिलांबाबत, सामाजिक; तसेच महिलांविषयक धोरणे ठरविणाऱ्या व्यक्ती, संस्था, प्रशासन यांना देहविक्री आणि त्यासंबंधीच्या कायद्यांविषयी माहिती नसते.’

देहविक्री करणाऱ्या महिलांच्या आरोग्य समस्यांसाठी खासगी आणि सरकारी आरोग्य केंद्रांनी सकारात्मक उपक्रम राबवावेत. या सर्वेक्षणाचा अहवाल इंडियन मेडिकल असोसिएशनकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. खासगी वैद्यकीय सुविधा केंद्रांमध्ये या महिलांना योग्य मार्गदर्शन आणि उपचार मिळावेत, अशी अपेक्षा आहे.
- तेजस्वी सेवेकरी, संचालिका, सहेली संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station: "थोरले बाजीराव पेशवे पुणे स्टेशन… "; रेल्वे स्थानकावर झळकले बॅनर, राज्यात नवा वाद पेटला!

Latest Maharashtra News Updates : शिवरायांनी महाराष्ट्रात स्वराज्याचे संस्कार रुजवले- शाह

Ind Vs Eng: हेझलवूडचा सल्ला मानला अन् आकाश दीपनं उडवली इंग्लंडची भंबेरी, काय होतं सिक्रेट?

Kolhapur : भूत काढण्याच्या बहाण्याने बेदम चोप, भोंदूबाबाकडून प्रसादाच्या नावाने लूट; कोल्हापूर अंधश्रद्धेच्या अडकत आहे का?

Ahilyanagar Accident:'टाकळीमियाच्या दिंडीला भीषण अपघात'; पिकअपच्या धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली; नऊ वारकरी जखमी

SCROLL FOR NEXT