pune-smart-city 
पुणे

पुणे : "कोरोनाच्या हाहाकारात स्मार्ट सिटी कंपनी काय करतेय?"

स्मार्ट सिटीच्या संचालकांनीच उपस्थित केले प्रश्न; तातडीने बैठक घेण्याची मागणी

सकाळ डिजिटल टीम

पुणे : शहरात कोरोनाचं थैमान सुरू असताना पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन काय भूमिका बजावत आहे? तसेच कोरोना निवारणासाठी स्मार्ट सिटीने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत? असा प्रश्न कंपनीच्या संचालकांनीच उपस्थित केला आहे. तसेच गेल्या चार महिन्यांपासून स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक झालेली नाही. ती तातडीने घ्यावी, अशी मागणीही संचालकांनी केली आहे.

पुणे स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक चार महिन्यांपूर्वी झाली आहे. कोरानाच्या काळात स्मार्ट सिटीने शहरात कोणत्या उपाययोजना केल्या? सध्या या कंपनीकडून कोरोनाचा सामना करण्यासाठी कोणते उपक्रम सुरू आहेत? याची कोणतीही माहिती दिली जात नाही, असा आरोप कंपनीच्या संचालक आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी केला आहे. स्मार्ट सिटीची कोणती कामे सध्या सुरू आहेत? कोणती कामे पूर्ण झाली आहेत? कोरोनामुळे निर्माण झालेल्या नव्या आव्हानांना स्मार्ट सिटी सामोरी कशी जाणार? या बाबतची माहिती नागरिकांसमोर येण्याची गरज असल्याचेही धुमाळ यांनी म्हटलं आहे.

स्मार्ट सिटी कंपनीनं उपाययोजना केल्या नाहीत

कंपनीचे संचालक आणि नगरसेवक रविंद्र धंगेकर म्हणाले, ‘‘स्मार्ट सिटी कंपनीला केंद्र आणि राज्य सरकारकडून कोट्यावधी रुपयांचा निधी नियमितपणे मिळत आहे. परंतु, स्मार्ट सिटीकडून कोणती कामे सुरू आहेत? याची माहिती दिली जात नाही. तसेच कोरोनाच्या काळातही स्मार्ट सिटीने कोणती कामे केली आहेत? औंध, बाणेर, बालेवाडी भागातही स्मार्ट सिटीने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. आता पुढच्या काळात तरी स्मार्ट सिटी संपूर्ण शहरासाठी कोणत्या उपाययोजना राबविणार, याची माहिती नागरिकांना मिळाली पाहिजे.’’ स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठकही तातडीने घ्यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, याबाबत स्मार्ट सिटी कंपनीच्या प्रशासनाकडे विचारणा केली असता, बैठक लवकरच घेण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी वेळ दिल्यावर बैठकीची तारीख निश्चित करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

स्मार्ट सिटीच्या कामांवर पालकमंत्री अजित पवार, खासदार गिरीश बापट यांनी यापूर्वी जाहीररित्या नाराजी व्यक्त केली आहे. स्मार्ट सिटीने केलेल्या कामांची चौकशी करण्याचेही आदेश पवार यांनी दिले आहेत. तसेच बापट यांनीही स्मार्ट सिटीच्या कामांच्या चौकशी करण्याची मागणी केंद्रीय नगरविकास खात्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. स्मार्ट सिटीकडून सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली जात नसल्याची संचालक मंडळाची आणि नागरिकांची तक्रार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 3rd T20I: अभिषेक शर्मा OUT, ४ खेळाडू IN? तिसऱ्या ट्वेंटी-२० साठी कशी असेल भारताची Playing XI? प्रिन्स यादव जखमी...

'सनई चौघडे' आणि 'हास्यजत्रा'नंतर निमिष कुलकर्णीची मोठी झेप; 'द्विधा'तून मोठ्या पडद्यावर एन्ट्री

मुंबई लोकलमध्ये थरार, विलेपार्ले स्थानकात ५ स्फोटांचा आवाज, नेमकं काय घडलं?

टीम इंडिया नंबर १ ! झिम्बाब्वेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतील विजयानंतर इंग्लंडला मागे फेकले

अभिजीतच्या घरी गेले शिंदेंचे मंत्री, आई-वडिलांची घेतली भेट; काय घडलं? कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT