Shankar-Mahadevan 
पुणे

शंकर महादेवन काय म्हणतात पुण्याविषयी पहा

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘मला पुण्यात कार्यक्रम सादर करायला खूप आवडते. मी सुगम संगीत, शास्त्रीय संगीतापासून फ्युजनपर्यंतचे अनेक प्रयोग पुण्यात केले आहेत. पुण्यातील प्रेक्षकांची दाद माझ्यासाठी कायमच महत्त्वाची राहिली आहे. सवाई गंधर्व महोत्सवात पुण्याच्या प्रेक्षकांनी मला दिलेली दाद अजूनही स्मरणात आहे,’’ अशी भावना प्रसिद्ध संगीतकार, गायक शंकर महादेवन यांनी व्यक्‍त केली. ते पुण्यात नुकतेच एका कार्यक्रमासाठी आले होते.

शंकर महादेवन म्हणाले, ‘‘मी पुण्यात विविध अवतारांमध्ये दाखल झालो आहे. याच शहरातील जर्मन बेकरीमध्ये मला ‘कल हो ना हो’ या गाण्याची चाल सुचली होती. येथे नाश्‍ता करीत असताना मी, एहसान व लॉय याच गाण्यावर विचार करीत होतो. ज्या बेकरीत ही चाल सुचली, तिथेच नंतर बाँबस्फोट झाले आणि या गाण्यातील जावेद अख्तर यांनी लिहिलेले शब्द त्या बेकरीचेच मनोगत सांगून गेल्याचे आम्हाला जाणावले. या सर्व घटनांमुळे मला पुण्यात यायला आणि गायला खूप भावते. मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे; मात्र, या आयटी सिटीमध्ये मी कामासाठी नव्हे,  तर केवळ गायनासाठीच आलो आहे.’

फ्युजन संगीत व त्याच्या सादरीकरणाबद्दल महादेवन म्हणाले, ‘‘ही कला तशी खूप जुनी आहे आणि अनेक भारतीय संगीतकारांनी तिचा उपयोग केला आहे. मात्र, फ्युजन सादर करताना गायकासह प्रत्येक वादक त्याच्या क्षेत्रातील तज्ज्ञ असल्यासच अपेक्षित परिणाम साधला जातो. गोव्यात मी फ्युजन सादर केल्यानंतर अमिताभ बच्चन आणि रजनीकांत या महानायकांनी त्याला दाद दिली आणि ही माझ्यासाठी अविस्मरणीय गोष्ट होती.’’

भविष्यातील प्रकल्पांबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘‘आम्ही ‘छपाक’ या दीपिका पदुकोणची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटासाठी संगीत दिले आहे. ॲसिड हल्ला झालेल्या तरुणीची ही गोष्ट दीपिकाने अभिनय केल्यानं दहापट परिणामकारकतेने प्रेक्षकांपर्यंत पोचेल. यातील साध्या व अर्थपूर्ण गाण्यांना संगीत देताना कामाचे समाधान मिळाले. ‘राझी’ चित्रपटातील ‘दिलबरो’सारखे गाणी ‘बिदाई अन्थम’ बनतात तेव्हा खूप आनंद होतो. माझी दोन्ही मुले शास्त्रीय संगीताची परंपरा पुढे नेत आहेत, याचा मला विशेष आनंद होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHADA: म्हाडाची पुन्हा लाॅटरी निघणार! ‘पीएमजीपी’तून मिळणार ९०० घरे, पन्नास टक्के जागेवर उभारणार सदनिका

आखाती युद्धाचा पर्यटनाला फटका! महिन्याभरापासून विमानसेवा विस्कळीत, ट्रॅव्हल एजन्सीतील प्रवाशांचे बुकिंग रद्द

Solapur Mangalevedha news: ‘बसव ज्योत’ सायकल यात्रेचे मंगळवेढ्यात जल्लोषात स्वागत; महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी जनजागृतीला वेग

Pune Ambegaon gas crisis: आंबेगावच्या पूर्व भागात गॅस पुरवठा ठप्प; ६० हजारांहून अधिक ग्राहक त्रस्त, उत्तर प्रदेश-बिहारमधील कुटुंबे परतगावी

IPL 2026, SRH vs LSG: रिषभ पंतच्या अर्धशतकाने लखनौने विजयाचं खातं उघडलं; रोमांचक सामन्यात काव्या मारनच्या हैदराबादचा घरात पराभव

SCROLL FOR NEXT