पुणे

व्हॉट्सॲपवर मंजुरी हा रजामंजुरीचा ग्राह्य पुरावा नाही

CD

‘व्हॉट्सॲप’वरील होकार
रजामंजुरीचा पुरावा नाही’

न्यायाधिकरणाचा निर्णय : रेल्वे कर्मचाऱ्याची बदली कायम

प्रयागराज, ता. २३ (वृत्तसंस्था) : ‘वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘व्हॉट्सॲप’वर ‘ओके’ असे उत्तर दिल्याने अतिरिक्त रजा मंजूर झाल्याचे सिद्ध होत नाही,’ असे स्पष्ट करत केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (कॅट) येथील खंडपीठाने रेल्वे कर्मचाऱ्याची बदली कायम ठेवली. रजेच्या वादातून सूडबुद्धीने बदली केल्याचा कर्मचाऱ्याचा दावा न्यायाधिकरणाने फेटाळला. उत्तर-मध्य रेल्वेतील कर्मचारी प्रिया रंजन कुमार यांनी रजेच्या वादातून झालेल्या बदलीच्या आदेशाला आव्हान दिले होते.

एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार कुमार यांनी १४ ते १६ जुलै २०२५ या कालावधीत मूळ गावी जाण्यासाठी तीन दिवसांची रजा घेतली होती. त्यानंतर त्यांनी ‘व्हॉट्सॲप’वर संदेश पाठवून आणखी दोन दिवस रजा वाढवून देण्याची विनंती केली. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक हिमांशू शुक्ला यांनी त्यावर ‘ओके’ असे उत्तर दिले होते. या उत्तराचा आधार घेत अतिरिक्त रजा अधिकृतपणे मंजूर झाल्याचा दावा कुमार यांनी केला. मात्र, २१ जुलै रोजी कामावर परतल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर २५ जुलै रोजी त्यांची प्रयागराजहून फतेहपूर येथे बदली करण्यात आली. या कारवाईमागे रजेचा वाद असल्याचे कुमार यांचे म्हणणे होते.

न्यायाधिकरणाचे सदस्य रजनीशकुमार राय यांनी स्पष्ट केले, की ‘व्हॉट्सॲप’वरील ‘ओके’ हा संदेश सक्षम प्राधिकाऱ्याने रजा अधिकृतपणे मंजूर केल्याचा निर्णायक पुरावा ठरू शकत नाही. बदली सूडबुद्धीने करण्यात आल्याचे सिद्ध करण्यात कुमार अपयशी ठरल्याचेही न्यायाधिकरणाने नमूद केले. दरम्यान, फतेहपूर रेल्वेस्थानकावर नवीन प्रवेशद्वार अन् तिकीट आरक्षण कार्यालय विकसित करण्यासाठी कर्मचाऱ्याची बदली आवश्यक असल्याचा युक्तिवाद रेल्वे प्रशासनाने केला. न्यायाधिकरणाने हा प्रशासकीय कारणांचा युक्तिवाद स्वीकारत कुमार यांचा अर्ज फेटाळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi custody : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईपर्यंत मुंबई पोलीस का पोहोचू शकत नाहीत?; 'साबरमती'तून ताब्यात घेण्यास बंदी का?

Mumbai Local: मुंबईकरांनो लोकलचा लेटमार्क विसरा, आता ताशी १०० किमी वेगाने गाड्या धावणार; मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates: पुणे शिक्षक मतदारसंघात पदवीधरांपेक्षा अधिक मतदान; दुपारी २ वाजेपर्यंतची आकडेवारी समोर

karnataka Politics : ''मेटा स्मार्ट ग्लास घालून माझं स्टिंग ऑपरेशन करण्याचा प्रयत्न'', मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ

Delhi Protests: सरकारला 'सीजेपी'चा धसका! आंदोलन पुन्हा पेटणार? गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT