WhatsApp chatting esakal
पुणे

Whatsapp : प्रेयसीचं चॅट पाहून डोकं भडकलं, प्रेम विसरून भररस्त्यात केली तिची धुलाई

प्रियकराला राग इतका अनावर झाला आहे की, त्यानं भर रस्त्यात प्रयसीची धुलाई केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रियकराला राग इतका अनावर झाला आहे की, त्यानं भर रस्त्यात प्रयसीची धुलाई केली आहे.

बऱ्याचवेळा अनेक तरुण-तरुणींचे वाद चव्हाट्यावर आलेले व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहत असतो. काही शुल्लक कारणावरून त्यांचा एकमेकांशी वाद सुरु असतो. कुणीतरी त्यांच्या नकळत व्हिडिओ शूट करुन तो व्हायरल केलेला असतो, असं अनेकवेळा घडत असतं. दरम्यान, आता पुण्यातून एक वेगळी बातमी समोर आली आहे. या घटनेतून मात्र पुणे तिथे काय उणे या म्हणीची प्रचितीच आली आहे.

आपल्या प्रेयसीचे व्हाट्सएप मेसेज पाहून प्रियकराचं डोकं फिरल्यानं त्यानं थेट प्रियसीला शिवीगाळी आणि मारहान केल्याची घटना घडली आहे. प्रियकराला राग इतका अनावर झाला आहे की, त्यानं भर रस्त्यात प्रयसीची धुलाई केली आहे. हा प्रकार घडला पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात घडला आहे. यामुळे काही काळासाठी या परिसरात तणाव निर्माण झाला होता.

घडलेली घटना अशी की, प्रेयसी मोबाईल बघत असताना तिने एका व्यक्तीला मेसेज केला. ते पाहून प्रियकराने रागाच्या भरात प्रेयसीला मारले. या घटनेनंतर संतापलेल्या २३ वर्षीय प्रेयसीनेही प्रियकराविरोधात आता पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रियकराविरुद्ध पोलिसांनी कलम 323, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे एकमेकांना ओळखतात आणि काही दिवसांपूर्वी त्यांचे एकमेकांशी सुतही जुळले आहे. सोमवारी ही तरुणी प्रियकराला भेटण्यासाठी मार्केट यार्ड परिसरात आली होती. यावेळी दोघे गप्पा मारत बसले होते. याचवेळी अचानक प्रियकराने तिचा मोबाईल तपासला आणि थेट व्हाट्सअप चॅटिंग वाचायला सुरुवात केली.

दरम्यान, प्रियसीने तिच्या बहिणीसोबत केलेले चॅटिंग वाचले. मात्र ते चॅटिंग वाचल्यानंतर ते मुलासोबत केले असावे असा संशय प्रियकराला आल्याने रागाच्या भरात त्याने तिला शिवीगाळ करत मारायला सुरुवात केली. या घटनेसंदर्भात आता पोलिसांनी त्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेची पुण्यात मात्र चांगलीच चर्चा सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT