शिधापत्रिकाधारकांना गहू, तांदूळ वाटप  sakal
पुणे

ऑक्टोबरअखेर गहू, तांदूळ वाटप करणार

गहू, तांदळाचे वितरण उद्यापर्यंत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश रेशन दुकानांमध्ये ऑक्टोबर महिन्यातील गहू, तांदूळ आणि अंत्योदय योजनेतील साखर पोच झाली आहे. आजअखेर ८५ टक्के धान्य वाटप झाले असून, ३१ ऑक्टोबरपर्यंत जवळपास ९५ टक्के धान्य वाटप होईल, अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले यांनी दिली. दरम्यान, दिवाळीत साखर आणि चणा डाळ उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.ऑक्टोबर महिन्यातील तांदूळ बहुतांश रेशन दुकानांमध्ये पोचला नव्हता. तसेच, तांदळाचा दर्जाही खराब असल्याच्या तक्रारी शिधापत्रिकाधारकांकडून प्राप्त झाल्या होत्या.

या संदर्भात अन्नधान्य वितरण अधिकारी ढोले म्हणाले, ‘‘धान्य उचल करण्यास भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामामधून (एफसीआय) सुरवात झाली आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत पुढील महिन्यातील धान्यही दुकानात उपलब्ध होईल. धान्याचा दर्जा सुधारण्याबाबत खाद्य महामंडळाला सूचना देण्यात आल्या आहेत.’’

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आणि राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत दर महिन्यास ५ हजार दोनशे मेट्रिक टन तांदूळ आणि १२ हजार ९९० मेट्रिक टन इतका गहू वितरित करण्यात येतो.

अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना गहू, तांदळासोबत साखर उपलब्ध करून देण्यात येते. परंतु या लाभार्थ्यांची संख्या केवळ ३२ हजारांच्या आसपास आहे. दिवाळीत सणासुदीच्या कालावधीत राज्य सरकारने अन्नसुरक्षा योजनेतील प्राधान्यक्रम कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना साखर, तेल आणि चणा डाळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

दर्जेदार धान्य पुरवावे, अशा सूचना भारतीय खाद्य महामंडळाला अन्नधान्य वितरण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. प्रत्येक शिधापत्रिकाधारकांनी धान्य घेतल्यानंतर दुकानदाराकडून पावती घ्यावी.

- सचिन ढोले, अन्नधान्य वितरण अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT