pune sakal
पुणे

प्रशासन व लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या समस्या कधी सोडवणार

विठ्ठल पवार ; कृषिपंपाचा विद्युतपुरवठा बंद केल्याने शेतकरी हवालदिल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वीज महावितरण कंपनीने कोणतीही नोटीस न देता कृषी पंपाचा विद्युतपुरवठा बंद केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी २४ बाय ७ शेतामध्ये कष्ट करतो, तरीसुद्धा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी दुर्लक्ष का करीत आहेत, असा संतप्त सवाल शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांनी उपस्थित केला.

वालचंदनमगरमधील (ता. इंदापूर) महावितरण व पारेशन कंपनी कार्यालयात विशेष कार्यकारी अभियंता गणेश लटपटे यांना पवार यांनी शुक्रवारी (दि. १९ नोव्हेंबर २०२१) रोजी कृषि पंपाचा विद्युत पुरवठा तातडीने सुरू करण्यासंबंधी निवेदन दिले. याप्रसंगी महावितरणचे नाळे, पाटील, डी.ई. सुळ, डी.ई. गोफने व वालचंदनगर पोलीस स्टेशनचे बी. एन. लातुरे, हरिश्चंद्र चांदगुडे आणि शेतकरी, कष्टकरी उपस्थित होते. यावेळी पवार यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ट्रान्सफॉर्मचे कनेक्शन तातडीने जोडले नाही, तर वालचंदनगर पोलीस स्टेशनमध्ये देखील महावितरण व पारेशन कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करू असा इशारा दिला आहे. कृषी पंपाचा विद्युत पुरवठा सुरू केला नाही, तर बारामती शहरासह पुणे, ठाणे, मुंबई या शहराचा उद्यापासून पुरवठादेखील खंडित केला जाईल, याच्या परिणामाला महापरेशन व वितरण अधिकारी जबाबदार राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar News: श्वानाच्या पिल्लाला बिबट्याचे अभय, बावड्या गावातील घटना सीसीटीव्हीत कैद

अमित ठाकरेंविरोधात BJP आक्रमक, माहीममध्ये भाजप-मनसे कार्यकर्ते आमनेसामने, पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

Mamata Banerjee Relative Death : ममता बॅनर्जींच्या नातेवाईक महिलेचा संशयास्पद मृत्यू; पतीसोबत सुरू होता घटस्फोटाचा खटला

१०२ पेक्षा जास्त ताप तरीही निवेदिता सराफ यांनी केलं 'कृष्णाईच्या लेकी'चं शूटिंग; अभिनेत्याच्या हातालाही होती सलाइन

Maharashtra Cabinet Decisions : मंत्रिमंडळ बैठकीवर तुकाराम मुंढेंचा प्रभाव चार महत्त्वाचे निर्णय; एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती

SCROLL FOR NEXT