esakal
पुणे

"जिथे बापटांना सोडलं नाही तिथं..."; सुषमा अंधारेंची MPSC विद्यार्थी आंदोलनावरून भाजपवर टीका

रुपेश नामदास

पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पध्दतीत केलेले बदल २०२५ पासून लागू करावेत. तसेच याबद्दलचे नोटीफिकेशन लगेच जारी करण्यात यावे यासाठी आंदोलन करत आहेत.

या आंदोलनात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भेट घेतली आहे. यावेळी त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, ही मुलं उद्याचं भविष्य आहे, या देशाचे भावी आधारस्तंभ आहेत.

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी तातडीने ही गंभीर बाब लक्षात घ्यायला हवी होती, मात्र मुलांची त्यांना काळजी नाही मुलं आजारी पडली काय, जिथे आईसीओ मधील गिरीष बापटांना ते प्रचाराच उतरवू शकतात. तर या मुलांच्या जिवाशी खेळणं तर सहज होऊ शकतं" अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे.

आंदोलनावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले

मी आणि मुख्यमंत्र्यांनी आयोगाशी याबद्दल चर्चा केली. हे शक्य नाही, हे २०२५ पासूनच लागू केलं पाहिजे असे आयोगाला सांगितले आहे. तसेच पुन्हा आयोगाची बैठक घेऊन यासंदर्भात निर्णय करा अन्यथा याविरोधात आम्हाला कायदेशीर बाजू घेऊन कोर्टात जावे लागेल असेही आयोगाला मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे फडणवीस म्हणाले.

आयोगाला कुठल्याही पध्दतीने विद्यार्थ्यांचे म्हणणे पटवून देता येईल. जोपर्यंत याचा निर्णय होत नाही तो पर्यंत आयोगाकडे नवीन जागा देखील पाठवत नसल्याचे देवेंद्र फडणीवस यावेळी म्हणाले. पहिलं हा निर्णय करावा असा प्रयत्न सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

फडणवीस पुढे म्हणाले की, सरकार शंभर टक्के आपल्या बाजूने आहे. आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आवश्यकता पडल्यास आम्ही कोर्टात जाऊ. पण हा निर्णय करून घेतला जाईल असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'ची दादागिरी संपणार? पुतीन यांची भारताला मोठी ऑफर! दोन्ही देशांना सापडला नवा व्यापारी मार्ग

Charas Seized : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक कोटींचे चरस जप्त; बँकॉकहून आलेल्या महिला प्रवाशाकडून कॉस्मेटिकच्या डब्यांतून तस्करी

Lohgaon News : लोहगाव अत्याचार प्रकरण; आरोपीला कठोर शिक्षेची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

Nagpur Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून; आरोपीला अटक, दोन महिन्यांपूर्वी आला होता कारागृहातून सुटून

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

SCROLL FOR NEXT