लाच घेताना पकडले sakal
पुणे

वीस हजाराची लाच घेताना मोजणीदारास रंगेहात पकडले

शेतजमिनीची हद्द कायम करण्यासाठी मागीतली होती लाच

डॉ. संदेश शहा

इंदापूर - शेतजमिनीची हद्द कायम करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना इंदापूर भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणीदारास लाचलुचपतप्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवार दि. १४ जून रोजी सायंकाळी रंगेहाथ पकडले. राजाराम दत्तात्रय शिंदे (वय ५४) असे लाचखोर मोजणी दार कर्मचाऱ्याचे नाव असून त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

इंदापूर तालुक्यातील निंबोडी येथील शेतकऱ्याला शेतीची मोजणी व हद्द कायम करायची होती. त्यासाठी त्याने भूमी अभिलेख कार्यालयात रीतसर शासकीय फी भरली होती. नमूद क्षेत्राच्या मोजणीनंतर हद्द कायम करण्यासाठी शेतकऱ्याच्या पुतण्याकडे संबंधित कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केली. पुतण्याने याबाबत पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याअनुषंगाने विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी मंगळवारी सायंकाळी इंदापूर प्रशासकीय इमारत भूमी अभिलेख कार्यालय येथे सापळा लावला. यामध्ये मोजणीदार राजाराम शिंदे (रा. मु.पो ढोक बाभुळ, ता. मोहोळ) याला २० हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: सिंहगड ग्रामपंचायतीच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT