Otur Police esakal
पुणे

71 म्हैशींचे प्राण वाचवून पाच ट्रकसह 60 लाखांचा मुद्देमाल जप्त; बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई

बकरी ईद सणाच्या (Bakari Eid Festival) पार्श्वभूमीवर ओतूर पोलिसांची ही मोठी कारवाई आहे.

पराग जगताप

बकरी ईद सणाच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण जिल्ह्यात जनावरांची अवैध वाहतूक व अवैध कत्तल रोखण्याबाबत मोहिम सुरू आहे.

ओतूर : ओतूर (ता. जुन्नर) येथील पोलिसांनी (Otur Police) ७१ म्हैशींचे प्राण वाचवून पाच ट्रकसह एकूण 60 लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून सात आरोपींना अटक केली असल्याची माहिती ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक एल. जी. थाटे यांनी दिली.

बकरी ईद सणाच्या (Bakari Eid Festival) पार्श्वभूमीवर ओतूर पोलिसांची ही मोठी कारवाई असून या मोहम्मद वकील इकरार खान (वय ६४ रा. अमरपूर, ता. सियाना, जि. बुलंदशहर उत्तरप्रदेश), तोहित वाहिद कुरेशी (वय ४५ , रा. शिवाजीनगर मुंबई), उस्मानखान रमजानखान (वय ६०, रा. गोवंडी, मुंबई), रशीद अब्दुल रहीम शेख (वय ३२, रा. गोवंडी, मुंबई), फिरोज सोहराब मलिक (वय ४३ , रा. ब्रहानाभुगरासी, ता. सियाना, जि. बुलंदशहर), फारूक कुरेशी (रा. फलटण सातारा) व मोहम्मद बिलाल भाईमिया शेख (रा. शिवाजीनगर कुर्ला मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. तर, पाच ट्रकसह ७१ जीवंत व दोन मृत म्हैस ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की बकरी ईद सणाच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण जिल्ह्यात जनावरांची अवैध वाहतूक व अवैध कत्तल रोखण्याबाबत मोहिम सुरू असून ओतुर पोलीस स्टेशन हद्दित खुबी, ता. जुन्नर येथे नाकाबंदी नेमण्यात आली होती. नाकाबंदी वाहन तपासणी दरम्यान एकूण ५ ट्रकच्या पाठीमागील हौ‌द्यामध्ये लहान-मोठे असे एकूण ७३ म्हैस जनावरे त्यांना वेदना होईल, अशा परिस्थितीत दाटीवाटीने चारा-पाण्याची व्यवस्था न करता, रस्सीच्या सा‌ह्याने कुरतेने जखडून बांधून जनावरांच्या वाहतुकीचा परवाना नसताना, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्वास्थ्य प्रमाणपत्र नसताना, तसेच जनावरांना इयर टॅगिंग केले नसताना बकरी ईदचे अनुषंगाने मुंबई येथे कत्तलीसाठी विकण्यासाठी वाहतूक करून घेऊन जात असताना मिळून आले.

त्यापैकी ७१ म्हशी जिवंत व २ म्हैस जनावरे ट्रकमध्ये मयत अवस्थेत मिळून आले. ७१ जिवंत म्हैशींना वारा-पाणी याच्या देखभालीसाठी जिवदया मंडळ गोशाळा संगमनेर, जि. अहमदनगर येथे जमा करण्यात आले आहे. सदर कारवाईमध्ये एकूण ५ ट्रक व ७१ जिवंत लहान-मोठे म्हैस जनावरे व २ मयत म्हैस जनावरे असा एकूण ६० लाख ४० हजारांचा मुद्देमाल मिळून आला असून आरोपी वरील सात आरोपींना प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत विविध कलमा खाली अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, अनिल केरूरकर, सहायक फौजदार महेशकुमार झणकर, पोलीस हवालदार ए.के.भवारी, धनंजय पालवे, महेश पटारे, भारती भवारी, दिनेश साबळे, शंकर कोबल, सुरेश गैंगजे, बाळशीराम भवारी, नामदेव बांबळे, विलास कोंढावळे, नदीम तडवी, संदीप लांडे, भरत सूर्यवंशी, ज्योतीराम पवार, सुभाष केदारी, शामसुंदर जायभाये, विश्वास केदार, रोहित बोंबले, मनोजकुमार राठोड, किशोर बर्डे, आशीष जगताप, विशाल गोडसे, अंबुदास काळे, राजेंद्र बनकर, सीमा काळे पोलीस मित्र शंकर अहिनवे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Squad: रोहित शर्माच्या सोबतीला सलामीसाठी दोन पर्याय! IPL 2026 Auction नंतर मुंबईचा संघ; तगडी Playing XI

IPL 2026 Auction : १९ वर्षीय आयुष, कार्तिक, २०चा प्रशांत वीर, २२ वर्षांचा ब्रेव्हिस; पण ४५ वर्षांचा MS Dhoni 'धुरंधर'; Memes व्हायरल

Achievers Of 2025: 'या' भारतीय कलाकारांनी बदलली मनोरंजनाची व्याख्या; त्यांच्या पॉवर परफॉर्मर्सवर एक नजर

Yavatmal News : बोगस मतदारांनंतर जन्म मृत्यूचीही बोगस नोंद? गावची लोकसंख्या दीड हजार, पण नोंदी २७ हजारापेक्षा जास्त; मुंबई कनेक्शन समोर...

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत लढविणार पन्नास जागा

SCROLL FOR NEXT