Esakal
पुणे

Darshana Pawar Case: दर्शना पवार हत्या प्रकरणात पोलिसांना संशय असणारा तिचा मित्र राहुल हांडोरे कोण आहे?

गावातील घराला कुलूप, दर्शना पवारचा मित्र राहुल हांडोरे यासह कुटुंबीयही गायब

अंकिता खाणे (Ankita Khane)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करून अधिकारी झालेली तरुणी दर्शना पवार हिच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे. डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे.(Latest Marathi News)

तर या प्रकरणात दर्शनाचा मित्र राहुल हांडोरेवर पोलिसांचा मोठा संशय आहे. संबधित घटनेनंतर तो फरार झाला आहे. राहुल हांडोरे याचा तपास घेत पोलिसांचं पथक थेट नाशिक जिल्ह्यातील शहा गावात पोहचलं. परंतु राहुलच्या घराला कुलूप आहे. त्याचं कुटुंब देखील घरी नाही. गेल्या आठवडाभरापासून कुटुंबीय गावात नसल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं आहे. मात्र पोलीस राहुलचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. (Latest Marathi News)

कोण आहे राहुल हांडोरे?

राहुल हांडोरे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शाह गावाचा आहे. त्याने BSC चं शिक्षण पूर्ण केलं आहे. तर तो पुण्यात MPSC ची तयारी करत होता. दर्शना आणि राहुल यांची ओळख पुण्यातच झाली होती. मागील काही महिन्यांपासून दर्शना आणि राहुल एकमेकांच्या संपर्कात होते. दोघेही ट्रेकिंगला गेले असता ही घटना घडली. 9 तारखेला हे दोघं ट्रेकिंगला गेले होते.(Latest Marathi News)

मात्र दोन ते तीन दिवस संपर्क न झाल्याने अखेल राहुलच्या कुटुंबियांनी 12 जूनला पोलिसांत तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. राहुलचे वडिल पेपर विक्रेते आहेत तर आई गृहिणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राहुल बाहेरगावी शिकत होता त्यामुळे गावात त्याच्याबाबत अनेकांना काही माहिती नाही.(Latest Marathi News)

दर्शनाचा मित्र राहुल हांडोरेचा फोन बंद असून दुसऱ्या राज्यात त्याचं लोकेशन आढळलं आहे. त्याने फोन सुरु केल्यावर तो कोणत्या भागात आहे, हे स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.(Latest Marathi News)

दर्शनाने घरी आणि मैत्रीणीला राजगडावर जात असल्याची माहिती दिलेली. काही तासांनंतर घरच्यांनी तिच्याशी संपर्क साधला परंतु तिचा फोन बंद लागला. घरच्यांनी तिच्या फोनची वाट पहिली. मात्र अनेकतास उलटून गेल्यावरही तिचा फोन न लागल्यामुळे सिंहगड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. राहुलचाही फोन न लागल्यामुळे त्यांच्याही कुटुंबियांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिस राहुलचा शोध घेत आहेत.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT