who is rickshaw driver Sharad Pawar  
पुणे

Lok Sabha Election 2024 : बारामतीतून उमेदवारी मिळालेले 'शरद पवार' कोण? 'या' संघटनेने दिली उमेदवारी

Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे यांना तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सागर आव्हाड

पुणे : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे हे वाहू लागले असून पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे यांना तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे असून आत्ता बारामती मधून भारतीय गीग कामगार मंच तसेच बघतोय रिक्षावाला संघटनेकडून पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे राहणाऱ्या शरद पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या रिक्षाचालक शरद पवार यांची जोरदार चर्चा सुरू आहे.

गीग कामगार मंच तसेच बघतोय रिक्षावाला संघटनेकडून शरद पवार यांच्यासहित पुणे जिल्ह्यात ४ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.यात बारामती मधून रिक्षाचालक शरद पवार यांना तर पुणे लोकसभा मतदार संघातून टेम्पो चालक मनोज वेताळ,मावळ मधून कॅब चालक संतोष वालगुडे आणि शिरूर मधून फूड डिलिव्हरी बॉय स्वप्नील लोंढे यांना उमेदवारी जाहीर झाली असून उमेदवारांच्या प्रचारार्थ १८ एप्रिल २४ रोजी प्रचार सभा घेऊन शक्ती प्रदर्शन करून बारामतीच्या उमेदवार शरद पवार यांचा अर्ज भरण्यात येणार आहे.

याबाबत अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर म्हणाले की व्यवसायातील गीग वर्कर्स यांच्या मागण्यांबाबत कोणत्याही राजकीय पक्षाने गांभीर्य न दाखवल्यामुळे, आम्ही मतदानाद्वारे आमचे आंदोलन मतपेटीतून पुढे नेत असून, या चार लोकसभा मतदार संघातील, ४ लाख गिग वर्कर्स व त्यांचे १६ लाख कुटुंबीय आमच्याच उमेदवारांना मतदान करून आमची ताकद आम्ही राजकीय पक्षांना दाखवून देऊ अस यावेळी ते म्हणाले.

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे शरद पवार हे राहत असून गेली 5 ते 6 वर्षापासून ते रिक्षा चालवत आहे.आत्ता ते बारामतीच्या रिंगणात उतरले असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सारखं त्यांचं नाव असल्याने त्यांची विशेष अशी चर्चा होऊ लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT