who mastermind killed sharad mohol munna polekar namdev kangude vitthal gandale police investigation Sakal
पुणे

Pune News : त्रिकुटाचा ‘मास्टरमाइंड’ कोण? गुन्हेगारी टोळ्यांच्या ‘कनेक्‍शन’चा पोलिसांकडून तपास

मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, विठ्ठल गांदले या त्रिकुटाने वेळोवेळी झालेला अपमान, मारहाणीचा बदला घेण्यासाठी शरद मोहोळला संपविले

पांडुरंग सरोदे -सकाळ वृत्तसेवा

Pune News : मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, विठ्ठल गांदले या त्रिकुटाने वेळोवेळी झालेला अपमान, मारहाणीचा बदला घेण्यासाठी शरद मोहोळला संपविले. मात्र त्यांच्या मनातील खदखद ओळखून त्यांना शस्त्र, पैसा पुरविणारा ‘मास्टरमाइंड’ कोण, हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. या खुनाशी गुन्हेगारी टोळ्यांचे ‘कनेक्‍शन’ असण्याची शक्‍यता आहे. त्यादृष्टीने पोलिस तपासाला दिशा देत आहेत.

मोहोळच्या घरापासून काही अंतरावर राहणारा पोळेकर प्रारंभी त्याच्या साथीदारांसह फिरू लागला होता. आठ ते दहा दिवसांपासून तो थेट मोहोळसोबत दिसत होता. त्याने मोहोळ व साथीदारांचा विश्‍वास संपादन केला.

त्याने मोहोळला लग्नाच्या वाढदिवशीच संपविले. पोलिसांनी वेगाने हालचाल करून आठ आरोपींना तत्काळ अटक केली. जमिनीचा वाद व अपापसातील भांडणामुळे खून केल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे, मात्र यास अनेक धागेदोरे असण्याची शक्‍यता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

...त्यांची ‘स्टोरी’ खरी आहे !

पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली. त्यांच्या माहितीची खातरजमा करण्यात आली. मोहोळचे साथीदार, खबरे व अन्य तांत्रिक माहितीच्या आधारे पडताळणी करण्यात आली. त्यानुसार आरोपींनी सांगितलेल्या घटना प्रत्यक्षात घडल्या असून ते खोटे बोलत नसल्याचे पोलिसही मान्य करतात. अशावेळी मोहोळला संपविण्याची इतर कारणे काय होती, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

खुनाचे नेमके कारण?

मुख्य आरोपी पोळेकर याचा मामा कानगुडे याच्याशी मोहोळचे झालेले भांडणे हे प्रमुख कारण सध्या पुढे येत आहे. पोलिसांनीही आतापर्यंत त्यानुसार तपास केला आहे. मात्र मोहोळ याच्यासारख्या टोळीप्रमुखाचा खून किरकोळ वैयक्तिक कारणातून कसा होऊ शकतो, हा प्रश्‍न पोलिसांनाही पडला आहे.

मोहोळचे राजकीय, वैयक्तिक मतभेद; माथाडी, जमीन व गुन्हेगारी टोळ्यांबरोबरील जुने वाद अशी काही महत्त्वाची कारणे असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने तपास करत असल्याचे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT