पुणे

Loksabha 2019 :  पुणेकर यंदा कोणता झेंडा घेणार हाती?

सकाळवृत्तसेवा

भाजपच्या स्थापनेपासूनच पुण्यात या पक्षाने काँग्रेसच्या एकहाती सत्तेला कायमच थेट आव्हान दिले. १९८४ पासून आठपैकी सहा वेळा (७२ टक्के) काँग्रेसने पराभव केला असला, तरीही भाजप हाच दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्याच वेळी काँग्रेसच्या विजयाचे मताधिक्‍य १९९८ नंतर सातत्याने कमी होत गेले. त्यामुळे काँग्रेसला सशक्त पर्याय म्हणून पुण्यात भाजपचा उदय झाला. फक्त तीन वेळा (२८ टक्के) काँग्रेसच्या उमेदवाराला चितपट करणाऱ्या भाजपची शहरात ताकद वाढत आहे. सध्या असलेले ६ः३ हे प्रमाण यंदा बदलून ७ :३ होणार की, ६ः४ या उत्तरासाठी आपल्याला २३ मेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

पुण्यावरची काँग्रेसची सैल होणारी पकड
पुण्यात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी पहिली लढत १९८४ साली झाली. काँग्रेसचे उमेदवार विठ्ठलराव गाडगीळ, तर भाजपच्या तिकिटावर जगन्नाथराव जोशी यांच्यात दुहेरी लढत झाली. अर्थात, या निवडणुकीला इंदिरा गांधी यांच्या खुनाची पार्श्‍वभूमी होती. त्यामुळे काँग्रेसच्या ‘पंजा’ला देशभरातून मतदारांनी हात दिला होता. त्या वेळी पुणेकरांनीही काँग्रेसच्या पारड्यात भरभरून मते टाकली. विठ्ठलराव गाडगीळ यांना ६०.३८ टक्के मते मिळाली होती. तर, जगन्नाथराव जोशी यांना २१.९ टक्के मतांवर समाधान मानावे लागले होते. त्या वेळी पुणेकरांनी गाडगीळांना ३८.४७ टक्के मताधिक्‍याने निवडून दिले होते. हे आतापर्यंत (३४ वर्षांमधील) उच्चांकी मताधिक्‍य आहे. हा विक्रम गेल्या गेल्या ३४ वर्षांमध्ये झालेल्या आठ निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाच्या कोणत्याच उमेदवाराला मोडता आला नाही. किंबहुना यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्या क्रमांकाच्या (१२.४६ टक्के) मताधिक्‍याने १९९९ मध्ये भाजपचे प्रदीप रावत निवडून आले. त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा पराभव केला. 

पुण्यात १९९८, २००४ आणि २००९ या अशा तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसचा झेंडा पुण्यावर फडकत असला तरीही निवडून येणाऱ्या उमेदवाराच्या मताधिक्‍यात सातत्याने घट होत होती. नव्या शतकाच्या सुरवातीला पुणे काँग्रेसवर सुरेश कलमाडी यांनी आपली पकड घट्ट केली. सलग दहा वर्षे पुण्यावरची ही पकड कधी सैल झाली नाही; पण त्याच वेळी १९९९च्या दरम्यान उदयास आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आणि काँग्रेस यांच्यातील सत्तास्पर्धा तीव्र झाली होती. त्यामुळे २००९ साली कलमाडी विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्या विरोधात अवघ्या २.५ टक्के मताधिक्‍याने निवडून आले.

...आणि ‘भाजप’ची वाढती ताकद 
१९५१ ते २०१९ अशा ६३ पैकी ३९ वर्षे पुण्यात काँग्रेसचा कारभारी होती. १५ वर्षे भाजपने सत्ता आपल्यात ठेवली, तर ना. ग. गोरे यांचा प्रजा सोशालिस्ट पक्ष, एस. एम. जोशींचा संयुक्त सोशालिस्ट पक्ष किंवा मोहन धारिया यांनी भारतीय लोक दलाकडून लढवलेली निवडणूक अशी १४ वर्षे फक्त इतर पक्षांतील उमेदवारांना पुणेकरांनी आपला प्रतिनिधी म्हणून दिल्लीला पाठविले होते. 

पुण्यात १९८९ मध्ये विठ्ठलराव गाडगीळ हे अण्णा जोशी यांच्या विरोधात फक्त १.२१ टक्के मताधिक्‍याने निवडून आले होते; पण त्यानंतरच्या १९९१च्या निवडणुकीत अण्णा जोशींनी गाडगीळ यांचा २.९९ टक्के मताधिक्‍याने पराभव केला. त्या वेळी राम जन्मभूमीचा प्रश्‍न देशभर धगधगत होता. त्यातून प्रथमच अण्णा जोशींच्या रूपाने पुण्यात ‘कमळ’ फुलले! 

स्वदेशीच्या मुद्द्यावरून काँग्रेसमधून फुटून शरद पवार यांनी १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्या वर्षीच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढले. त्यामुळे काँग्रेसच्या मतांमध्ये फूट पडली. काँग्रेसच्या मोहन जोशी यांना दुसऱ्या क्रमांकाची (२९.१६ टक्के मताधिक्‍य) मते, तर राष्ट्रवादीच्या विठ्ठल तुपे यांना (२७.१३ टक्के मताधिक्‍य) तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. या दोघांच्या मतांची बेरीज चार लाख १२ हजार ४०८ होत होती. तर, यात विजयी झालेल्या भाजपच्या प्रदीप रावत यांना ३ लाख चार हजार ४५ (४१.६२ टक्के मताधिक्‍य) मते मिळाली होती. रावत हे १२.४६ टक्के मताधिक्‍याने निवडून आले. पण, त्यानंतर २००४ मध्ये कलमाडींविरोधात पुन्हा मैदानात उतरलेल्या रावत आणि पाठोपाठ २००९ मध्ये अनिल शिरोळे यांचा टिकाव लागला नाही. पण, २०१४च्या मोदी लाटेत अनिल शिरोळे ५७.३७ टक्के मताधिक्‍याने काँग्रेसचे डॉ. विश्‍वजित कदम यांच्या विरोधात निवडून आले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुण्यावर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार, याची उत्सुकता आहे. 

लोकसभा 2019

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT: सीएसएमटी स्थानकात लोकल रुळावरुन घसरली; सलग दुसरी घटना घडल्यानं खळबळ

Shashi Tharoor T20 WC 2024 : माझा मतदारसंघ करणार वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व.... शशी थरूर भारतीय संघाची घोषणा होताच हे काय म्हणाले?

Poorest Politicians: भारतातील सर्वात गरीब 'पुढारी' कोण आहेत? ज्यांच्याकडे आहे फक्त 1,700 रुपयांची मालमत्ता

Latest Marathi News Live Update: अमेठी, रायबरेलीची जागा लवकरच जाहीर होणार; खर्गे घेणार पत्रकार परिषद

Rupali Ganguly: वेट्रेस म्हणून केलं काम, गाजवला छोटा पडदा अन् आता भाजपमध्ये प्रवेश; जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

SCROLL FOR NEXT