puneuniversity 
पुणे

विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करणार कोण?

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘एमबीए’ प्रवेशासाठी ‘एटीएमए’ प्रवेश परीक्षेच्या बनावट गुणपत्रिका सादर करून ‘पुम्बा’मध्ये प्रवेश मिळवून शासनाची फसवणूक करणाऱ्या चौघांची संस्थेने हकालपट्टी केली. मात्र, या प्रकरणाशी आमचा संबंध नसल्याने आम्ही गुन्हे दाखल करणार नाही, असा पवित्रा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे. तर, उच्च तंत्र शिक्षण विभागाने गुन्हा विद्यापीठालाच दाखल करावा लागेल, असे स्पष्ट केले. पण, या गोंधळात शिक्षणातील फसवणुकीला मोकळे रान मिळाले आहे.

महाराष्ट्रात ‘एमबीए’साठी वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. २०१८-१९ मध्ये ‘एआयएमएस टेस्ट फॉर मॅनेजमेंट ॲडमिशन्स’ची (एटीएमए) परीक्षा न देता राज्यभरात २९ जणांनी बोगस गुणपत्रिका उच्च तंत्र शिक्षण विभागाला सादर करून विविध संस्थांमध्ये प्रवेश घेतला होता. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर हा प्रकार उच्चतंत्र शिक्षण विभागाला लक्षात आला. त्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘पुम्बा’मध्ये चौघांन,त्तिर इंदिरा इन्स्टिट्यूटला एकाने, असे पाच जणांनी प्रवेश घेतले होते. उच्च तंत्र शिक्षण विभागाने दोन्ही विभागांना पत्र पाठवून या विद्यार्थ्यांना संस्थेतून काढून टाकावे आणि गुन्हे दाखल करावेत, असे आदेश दिले होते.कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, ‘‘तंत्रशिक्षण विभागाने जी यादी दिली, त्यानुसार ‘पुम्बा’मध्ये प्रवेश झाले. त्याचा आमचा संबंध नाही. ’’ तंत्रशिक्षण विभागाचे उपसंचालक दिलीप नंदनवार म्हणाले, ‘‘या प्रकरणात शासनाची फसवणूक झालेली असली, तरी ज्या संस्थेत विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला आहे, त्यांनीच गुन्हा दाखल केला पाहिजे. ’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उन्हाचा चटका अन् वादळी पावसाचाही तडाखा बसणार, कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भाला हवामान विभागाचा इशारा

शरण आलेल्या माओवाद्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया, कौटुंबिक आयुष्य सुखकर होणार

युद्ध थांबणं कठीण! इराणच्या अटी ठरू शकतात अडथळा, होर्मुझ टोल ते लष्करी तळ; अमेरिकेसमोर काय अटी?

Surat Station Redevelopment: A Boost for Mumbai-Gujarat Connectivity : मुंबई-सुरत लोकल सेवा सुरू होणार? सुरत स्टेशनवर सुरू असलेल्या 'या' कामांमुळे चर्चेला उधाण.

NRAI Demands Immediate Restoration of Commercial LPG Supply : एमएनजीएल (MNGL) पाईपलाईन आता वेगाने धावणार? हॉटेल उद्योगासाठी मोठी बातमी.

SCROLL FOR NEXT