Who will pay electricity bill of Digital Anganwadi Municipal Corporation Zilla Parishad msedcl pune sakal
पुणे

डिजिटल अंगणवाडीचे वीजबिल कोण भरणार पालिका की जिल्हा परिषद?

महावितरणने नेले मीटर काढून; प्रशासनाच्या वादात चिमुकल्यांचे हाल; खडकवासला येथील नागरिक संतप्त

निलेश बोरुडे

किरकटवाडी : मागील सुमारे वर्षभरापासून वीजबिल थकल्याने महावितरणने खडकवासला येथील आंगणवाडीचे मीटर दोन महिन्यांपूर्वी काढून नेले आहे. परिणामी फॅन, प्रोजेक्टर, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा अशी सर्व विद्युत उपकरणे बंद आहेत. थकलेल्या वीजबिलाचा भरणा जिल्हा परिषदही करत नाही व अजून शिक्षण विभाग पालिकेकडे हस्तांतरित न झाल्याने पालिकाही याची जबाबदारी घेत नाही. परिणामी प्रशासनाच्या वादात चिमुकल्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

30 जून 2021 रोजी खडकवासला गावचा पुणे मनपा हद्दीत समावेश करण्यात आला. तोपर्यंत ग्रामपंचायत कारभार पाहत असल्याने गावातील शाळा व अंगणवाड्यांच्या वीजबिलाचा नियमित भरणा करण्यात येत होता. गाव पालिकेत गेले मात्र शिक्षण व आरोग्य विभाग अद्यापही पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेला नाही. परिणामी पालिकेने मागील सुमारे वर्षभरापासून अंगणवाडीचे वीजबिल भरलेले नाही. महावितरणने मात्र वीजबिल थकल्याने दोन महिन्यांपूर्वी मीटर काढून नेले आहे. सध्या या अंगणवाडीत चाळीस मुले-मुली येतात. उन्हाळ्यातही अंगणवाडी सुरू होती मात्र विद्युतपुरवठा खंडीत असल्याने चिमुकल्यांना नाहक गैरसोय सहन करावी लागत आहे.

" लहान मुलांच्या मनोरंजनासाठी असलेली सर्व उपकरणे लाईट अभावी बंद आहेत. त्यामुळे माझी मुलगी अंगणवाडीत बसण्याचा कंटाळा करते. उन्हाळ्यात तर खुप वाईट अवस्था होती. पालिकेने काहीतरी मार्ग काढावा."

- सिद्धार्थ भोसले, पालक, खडकवासला.

"अंगणवाडी अत्यंत सुसज्ज बनविण्यात आलेली आहे. केवळ विजेअभावी सर्व उपकरणे बंद असणे हे आपल्या व्यवस्थेचं दुर्दैव आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याचा त्रास चिमुकल्यांना सहन करावा लागत आहे. शासनाने याबाबत तोडगा काढणे गरजेचे आहे."

- ॲड. अनुराधा मते, नागरिक, खडकवासला.

" अंगणवाडीचा वीजपुरवठा खंडीत असल्याने अनेक पालकांच्या तक्रारी आहेत.सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाला याबाबत वारंवार कळविले आहे. पालिकेचे अधिकारी जिल्हा परिषदेकडे व जिल्हा परिषदेचे अधिकारी पालिकेकडे बोट दाखवत आहेत."

- सौरभ मते, माजी सरपंच, खडकवासला.

" शिक्षण विभाग अद्याप पालिकेच्या शिक्षण मंडळाकडे हस्तांतरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे उत्तरदायित्व निश्चित झालेले नाही. संबंधित विभागाला याबाबत कळविण्यात येईल." - प्रदीप आव्हाड, सहाय्यक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय, पुणे मनपा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakt Tanpure: शरद पवार गटाचा किल्ला ढासळणार, राष्ट्रवादीचा पहिला आमदार भाजपच्या वाटेवर; राजकारण पालटणार

Horoscope : जूनच्या सुरुवातीलाच बदलणार 'या' 3 राशींचे नशीब; नोकरी-धंद्यात मोठी कलाटणी, बनतोय धनलाभ योग

Pune Liquor Tragedy : धक्कादायक उलगडा! गावठी दारूचा एकच घोट कसा ठरतो मृत्यूचं कारण? आतली भयावह प्रक्रिया वाचा

Mukesh Ambani: 1 रुपयाही पगार नाही, तरी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती! मुकेश अंबानींची कमाई नेमकी कशी होते?

RCB विरुद्ध घरच्या मैदानात फायनल! गुजरातचा प्लॅन काय, कसा खेळणार संघ? शुभमन गिलने केला खुलासा

SCROLL FOR NEXT