Raj Thackeray Pune esakal
पुणे

Raj Thackeray Pune: राज ठाकरे पुण्यात बैठक न घेता संतापून का निघून गेले? पडद्यामागे नेमकं काय घडलं? सविस्तर वाचा...

Raj Thackeray Pune: पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज (ता. ३) दुपारी पक्ष कार्यालयात आल्यानंतर अनेक पदाधिकारी उपस्थित नव्हते, बैठकीला सुरुवात होत नव्हती.

ब्रिजमोहन पाटील - सकाळ वृत्तसेवा

Raj Thackeray Pune:

पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज (ता. ३) दुपारी पक्ष कार्यालयात आल्यानंतर अनेक पदाधिकारी उपस्थित नव्हते, बैठकीला सुरुवात होत नव्हती. त्यामुळे संतापलेले ठाकरे थेट पक्ष कार्यालयातून निघून गेल्याची घटना घडली. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पक्ष प्रवक्त्यांनी राज ठाकरे नाराज होऊन गेले नाहीत असा दावा केला आहे.

राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर असल्याने त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेण्याचे निश्‍चित केले. त्यासाठी शाखा प्रमुखांपासून ते संघटकांपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी निरोप देण्यात आला होता. राज ठाकरे हे दुपारी दोनच्या सुमारासच नवी पेठेतील पक्ष कार्यालयात पोहचले.

राज्य पातळीवरचे काही पदाधिकारी सोडता इतर स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी बैठकीपूर्वी पक्ष कार्यालयात पोहचले नाहीत. थोडा वेळ वाट पाहिली, अडीच वाजून गेले तरी बैठक सुरु झाली नाही. पक्ष कार्यालयाबाहेर प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी ठाकरे यांच्याशी संवाद साधण्यासाठी उपस्थित होते. पण त्यांनी मला माध्यंमांसोबत काही बोलायचे नाही, असे पदाधिकाऱ्यांमार्फत निरोप पाठवला. (Latest Marathi News)

त्यानंतरच काही वेळात संतापलेले राज ठाकरे यांनी ही बैठक वेळेत सुरु करायची नव्हती तर, मला इथे कशाला बोलावले? असा जाब पदाधिकाऱ्यांना विचारत कार्यालयातून बाहेर पडले. त्यानंतर ते थेट मुंबईच्या दिशेने रवाना झाले असे सूत्रांनी सांगितले.

याबाबत पक्षाचे प्रवक्ते योगेश खैरे म्हणाले, ‘‘बैठकीला उशीर झाला म्हणून राज ठाकरे नाराज होऊन निघून गेलेले नाहीत. त्यांनी काही संघटकांशी चर्चा सुरु केली होती, पण त्यांना जशी माहिती अपेक्षीत होती, तशी माहिती मिळत नसल्याने त्यांनी तुम्ही आणखी तयारी करून पदाधिकाऱ्यांशी चर्चा करा. त्यानंतर मी बैठक घेतो असे सांगितले त्यानंतर ते कार्यालयातून बाहेर पडले. राज ठाकरे गेल्यानंतर आम्ही मतदारसंघनिहाय बैठका घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT