Why the shortage of Remdesivir 
पुणे

का होतोय रेमडेसिव्हिरचा तुटवडा?

योगिराज प्रभुणे

पुणे : औषध निर्माण कंपन्यांच्या वितरणाच्या धोरणांमुळे रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुणे जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आहे. कंपनीच्या वितरण साखळीतील त्रुटीमुळे हे इंजेक्शन सामान्य रुग्णांपर्यंत पोचवण्यात असंख्य अडचणी येत असून, त्यातून रुग्णांच्या नातेवाइकांची फरफट होत आहे, असा थेट आरोप ‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट’ने केला आहे. 


ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘पुण्यात रेमडेसिव्हिर मिळेना’ या शिर्षकाखाली ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. त्यात जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या बारा वितरकांचे संपर्क क्रमांकही देण्यात आले आहेत. त्यातील प्रत्येक वितरकांशी संपर्क साधून त्यांच्याकडे इंजेक्शन आहे का, याची चौकशी करण्यात आली. त्या आधारावर प्रसिद्ध झालेल्या बातमीवर प्रतिक्रिया देताना ‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट’ने हा आरोप केला.      


आजच्या या करोना संक्रमणाच्या काळात सर्वसामान्य केमिस्ट काऊंटरवर येणाऱ्या रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन शक्य होईल तेथून मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या मार्केटमध्ये  सिप्ला, डॉक्टर रेड्डी , मायलान,  हेट्रो आणि ज्युबिलंट या कंपन्यांचे हे इंजेक्शन उपलब्ध असतानाही ते सामान्य रुग्णांना का मिळत नाही याचा अभ्यास अन्न व औषध प्रशासनने (एफडीए) करण्याची गरज आहे, असेही या असोसिएशनने पाठविलेल्या पत्रकात नमूद केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या परिस्थितीत सुद्धा आदरणीय  आमदार आप्पासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट ही आमची संघटना प्रत्येक केमिस्ट कडे येणाऱ्या रुग्णांना ही इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. 

कंपन्यांच्या औषध वितरणाच्या चुकीच्या पद्धतीमुळे या औषधांचे वितरणामध्ये गोंधळ उडतो आहे. कंपनीकडून हे औषध डेपोमध्ये येते त्याच वेळी कंपनी कुठल्या हॉस्पिटलच्या ड्रग स्टोअरला किती इंजेक्शन्सचा पुरवठा करायचा हे ठरवून देते. डिस्ट्रीब्यूटरकडे हा स्टॉक आल्यानंतर तो थेट हॉस्पिटलच्या ड्रग स्टोअर्सला द्यावा लागतो. उपचारांसाठी दाखल रुग्णांनासाठीच आम्ही इंजेक्शन साठा ठेवलेला असून इतरांना तो देता येणार नाही, असे हॉस्पिटलतर्फे सांगितले जाते. त्यामुळे इतर ठिकाणी ही औषधे न मिळाल्यास हे रुग्णांचे नातेवाइक इंजेक्शनच्या शोधात सामान्य केमिस्टकडे येतात केमिस्टकडे या औषधाचा साठा उपलब्ध नसल्याने केमिस्ट पण गोंधळून गेलेले आहेत, असे असे असोसिएशनचे अध्यक्ष सुशील शहा आणि सचिव अनिल बेलकर यांनी सांगितले. 

अंगावर धावणारी मोकाट कुत्री अन् तळीरामांचा त्रास; सांगा उद्यानात यायचे कसे?

या इंजेक्शनच्या वितरणासाठी केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टने विशेष परवाना घेतला आहे. परंतु घाऊक विक्रेत्यांची यामध्ये काही चूक नसताना कंपनीच्या चुकीच्या वितरण प्रणालीमुळे संघटनेला पुरेशा प्रमाणात इंजेक्शनचा पुरवठा होत नाही. ही औषधे सर्व केमिस्ट मार्फत रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य त्या प्रमाणात सर्व केमिस्टकडे व केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट यांच्याकडे उपलब्ध करून द्यावीत ही कळकळीची विनंतीही त्यांनी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Dhas: ''माझा मुलगा सुपारीसुद्धा खात नाही'', 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'च्या आरोपावर सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

एक नायक तर दुसरी खलनायिका; टीव्हीचे गाजलेले चेहरे पुन्हा भेटीला येणार; कोण आहेत ते? प्रेक्षकांनी सांगितली नावं

Jalgaon News : खेळता खेळता हरवला जीव! जळगावात १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Electricity Supply: अदानी हटाव..., प्रीपेड मीटरला ग्राहकांचा नकार; महावितरण खाजगीकरणाविरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

Pune Market Committee : संचालक मंडळ बरखास्त करून ईडी व इन्कम टॅक्स चौकशी करा; राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष विकास लवांडे यांची मागणी

SCROLL FOR NEXT