Lok Sabha Election 2024 Sakal
पुणे

Lok Sabha Election 2024 : आम्ही का करावे मतदान? पाषाण परिसरात बॅनरद्वारे नागरिकांची नाराजी

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्वत्र मतदार जागृती केली जात आहे.तर राजकीय पक्षांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे.

बाबा तारे

औंध : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्वत्र मतदार जागृती केली जात आहे.तर राजकीय पक्षांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे.परंतु पुण्याच्या पाषाण भागात राजकीय नेत्यांनी व प्रशासनाने मागील कार्यकाळात सामान्य नागरिकांची कामे न केल्याचे सांगत कंटाळलेल्या नागरिकांनी बॅनरद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

यात त्यांनी राजकीय नेत्यांसह प्रशासनालाही जबाबदार धरले आहे.तसेच या बॅनरवर 'जेव्हा प्रशासनाला नाही राहिले भान,न राहिली आम्हा मतदारांची जाण,मग आम्ही काय करावे मतदान ?' अशा आशयाचा मजकूर प्रसिद्ध केला आहे.

पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी या भागात मुलभूत सुविधा पुरविण्यात आल्या नसल्याचे या बॅनरवर मांडण्यात आले आहे.एकवेळ भारत पाकिस्तान प्रश्न सुटेल परंतु पाषाण तलावातील जलपर्णी काढली जाईल का?

अशी शंका असल्याचेही बॅनरद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे.पाणी,ड्रेनेज, रस्ते,खेळाचे मैदान यासाठी नागरीकांना झगडावे लागते.तसेच लोकप्रतिनिधींनीही या भागाकडे दुर्लक्ष केल्याने आमचा रोष या बॅनरच्या माध्यमातून जाहिर केल्याचे समीर उत्तरकर व अमित खानेकर यांनी सांगितले.आम्हाला साड्या,भेटवस्तू,जेवण इत्यादी वाटणारे लोकप्रतिनिधी नको तर आम्हाला आमचे प्रश्न सोडवणारे लोकप्रतिनिधी हवे आहेत अशा आशयाचा मजकूर या बॅनरवर झळकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

Chhatrapati Sambhajnagar: दिवसभर उकाडा; सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी; विजांच्या कडकडाटासह शहरभर पावसाचे आगमन

Shaktipith Highway Kolhapur : शक्तिपीठ महामार्गाचा नकाशा बदलला, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, शिरोळ, हातकणंगले वगळले

Pune Rain News: पुण्याला गारांच्या पावसाचा तडाखा; मध्यवर्ती भागासह उपनगरांत नागरिकांची तारांबळ, झाडपडीच्‍या आठ घटना!

Chhatrapati Sambhajinagar: त्याने भरले बेरंगी आयुष्यात रंग!; ऑटिझमवर मात करीत स्वराज राजपूत बनला आईचा आधार

SCROLL FOR NEXT