wife husband family dispute murder attempt crime pune police sakal
पुणे

Crime News : 'तुला आज संपवतोय, असे म्हणत ,पत्नीच्या डोक्यावर कोयत्याने वार करुन खुनाचा प्रयत्न..

पत्नीच्या डोक्यावर कोयत्याने वार करून तिला गंभीर जखमी केल्याबद्दल खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा सिंहगड रोड पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला

विठ्ठल तांबे

धायरी : पत्नीच्या डोक्यावर कोयत्याने वार करून तिला गंभीर जखमी केल्याबद्दल आनंद मसाजी वाघमारे ( वय ३७, रा. साई अविष्कार सोसायटी, फलॅट नं. 303, ओ विंग, चव्हाणबाग, डीएसके रोड, धायरी) याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा सिंहगड रोड पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला.

करुणा आनंद वाघमारे (३१) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. नेकलेस दागिन्यासाठी ४ महिन्यापूर्वी २५ हजार रुपयांचे बुकींग केलेल्या पैशांबाबत विचारणा केली असता आनंद याने चिडून  वाद घातला व हल्ला केला. वादानंतर करुणा त्यांच्या मुलासह त्यांचे वडील  महादेव सुरवसे ( रा. उस्मानाबाद) यांच्याकडे निघाल्या असताना आनंद याने चिडून शिवीगाळ केली.

उजवा हात पिरगाळून करंगळी शेजारील बोट दुमडले. करुणा यांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्या हाताला चावा घेतला. आनंद याने  बेडखालुन कोयता काढून "तुला आज संपवतोय, असे म्हणत करुणा यांच्या हडोक्यात, उजव्या भुवईच्या वर तसेच उजव्या कानाचे वर कोयत्याने सपासप वार केले. सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे)जयंत राजुरकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक  सचीन निकम यांनी घटनास्थळी पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

SCROLL FOR NEXT