माळेगाव (ता. बारामती) - कृषी विज्ञान केंद्रामध्ये औषधी व सुगंधी वनस्पतीची फुललेली शेती. 
पुणे

यंदा दरवळणार जंगली सुगंध

सकाळ वृत्तसेवा

माळेगाव - कधीकाळी जंगलात वाढणारी औषधी व सुगंधी वनस्पती उत्पन्नाचा स्रोत विचारात घेऊन जर आपल्या शिवारामध्ये शेती म्हणून लागवड केली, तर नवल वाटायला नको. ही किमया साकारली आहे बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राने. त्यामुळे यंदा कृषिक प्रदर्शनाच्या गर्दीत वरील शेतीचा सुगंध दरवळणार हे मात्र नक्की.

बारामतीतील शारदानगर येथे १६ जानेवारीपासून चार दिवस भरणाऱ्या कृषिक प्रदर्शनाची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. या प्रदर्शनात औषधी वनस्पती व सुगंधी वनस्पतीचे हिरवेगार प्लॉट आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहेत. अलीकडच्या काळात कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे, प्रगतिशील शेतीकरिता नावीन्यपूर्ण संशोधन पुढे यावे यासाठी येथील कृषी विज्ञान केंद्र सातत्याने प्रयत्न करीत आहे. या केंद्राने औषधी व सुगंधी वनस्पतीच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रेरित केले आहे. शिवाय कृषिक प्रदर्शनाच्या माध्यमातून औषधी व सुगंधी वनस्पतीची शेती आणि त्यातून भरघोस उत्पन्न घेता येऊ शकते, याचे उत्तम प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवले जाणार आहे.

कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सय्यद शाकिर अली म्हणाले, ‘‘व्यावसायिक औषधी कंपनीच्या माध्यमातून करार शेतीचा प्रयोग राबविण्यास सुरवात झाली आहे. त्यामध्ये शतावरी, अश्वगंधा, जीरेनिम, गवती चहा, खस, सर्पगंधा, सफेद मुसळी, शेवगा, माधुपर्णी, रुश्‍या घास, रक्तचंदन, हळद आणि तुळशीसारख्या वेगवेगळ्या पिकांमधून वार्षिक निव्वळ नफा पन्नास हजारांपासून ते पाच लाखांपर्यंत घेता येतो.’’

लोकांचा कल आयुर्वेदाकडे
आयुर्वेद हे पुरातन शास्त्र असून भारतामध्ये त्याचा उपयोग विविध रोगांच्या उपचारासाठी केला जातो. सध्या आपण ॲलोपॅथीसारख्या औषधांवर अवलंबून आहोत आणि त्याचा दुष्परिणाम माणसांच्या आरोग्यावर दिसून येतो. त्यामुळे लोक पुन्हा आयुर्वेदाकडे आणि आयुर्वेदिक उपचाराकडे वळू लागले आहेत. त्यासाठी लागणारी औषधी वनस्पतीची उपलब्धता आपल्या देशामध्ये खूप कमी आहे आणि ज्या उपलब्ध आहेत त्या जंगलातून गोळा केल्या जात आहेत, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; दिला सतर्कतेचा इशारा

Nagpur Vidhan Bhavan Project: नागपूर विधानभवनाचे रूपडे पालटणार; १,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दोन्ही सभागृह येणार एकाच छताखाली

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

Maharashtra Rain: पालघरमध्ये मुसळधार! 24 तासांत 134 मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प

Navi Mumbai: बटाटावड्यात आढळली अळी, नवी मुंबई महापालिकेच्या भोजनालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT