पुणे

केळघर कासुर्डे मृत्यू

CD

रानगव्याच्या हल्ल्यातील
जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

केळघर, ता. २५ : महाबळेश्वर- मेढा रस्त्यावर टेकवली गावच्या हद्दीत रानगव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रेंगडी (ता. जावळी) येथील प्रभाकर कासुर्डे यांचा सातारा येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान आज दुर्दैवी मृत्यू झाला.
सोमवारी (ता. २३) सायंकाळी महाबळेश्वरवरून काम आटोपून प्रभाकर कासुर्डे (वय ४८) हे रेंगडी येथे येत असताना महाबळेश्वर- सातारा रस्त्यावर टेकवली बसथांब्याजवळ अचानक जंगलातून एक गवा रस्त्यावर आला. गव्याने दुचाकीवरील प्रभाकर कासुर्डे यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना महाबळेश्वर येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते; परंतु गंभीर अवस्था असल्याने तातडीने सातारा येथील खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. आज सकाळी ११ वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रभाकर कासुर्डे यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
-----------------------
प्रभाकर कासुर्डे .
01406
--------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bill Gates Confession : मोठी बातमी! ‘एपस्टीन फाइल्स’ प्रकरणी बिल गेट्स यांचा धक्कादायक कबुलनामा

भूत, धमाल आणि ओजी स्वॅग: ‘भूत बंगला’मधील ‘रामजी आके भला करेंगे’ गाण्याचा टीझर रिलीज

Blocked Nose & Headache: सततचे नाक चोंदणे आणि डोकेदुखीः साधी ऍलर्जी की नाकातील घातक गाठी? वेळीच व्हा सावध !

Kidney Transplant : हलाखीच्या परिस्थितीतही बाप ठरला ‘जीवनदाता’; वडिलांनी दिली मुलाला किडनी

Palghar: पालघरकरांचे हाल! तारापूर परिसरात हवेची गुणवत्ता ढासळली, विविध आजारांमुळे स्थानिक बेजार

SCROLL FOR NEXT