पुणे

ढेबेवाडी शाळूची शिवारेच्या शिवारे रातोरात आडवी

CD

शाळूची शिवारेच्या शिवारे रातोरात आडवी

मोठे नुकसान; काळगावसह ढेबेवाडी विभागात रानडुकरांच्या कळपांनी उडविली शेतकऱ्यांची झोप

ढेबेवाडी, ता. ३० : काळगाव, धामणीसह ढेबेवाडी विभागात रानडुकरांच्या कळपांचा ज्वारीच्या पिकात अक्षरशः धुडगूस सुरू आहे. शाळूचे उभे पीक रातोरात आडवे होत असल्याने शेतकरी रडकुंडीला आले आहेत.
ढेबेवाडी विभागातील जंगलाच्या कुशीत वसलेल्या गावे व वाड्यावस्त्यांतील शेतकरी वन्यप्राण्यांचा सततच्या उपद्रवाने हैराण झाले असून, लागवडीखालील क्षेत्रावरही त्याचा विपरीत परिणाम सुरू आहे. नुकसानीपेक्षा शेती पाडून ठेवलेली बरी अशीही भावना शेतकऱ्यांत गेल्या काही वर्षांमध्ये वाढल्याने पडीक क्षेत्रात मोठी वाढ होत चालली आहे. खरिपाच्या पीक काढणीनंतर डोंगरपट्ट्यात बहुतांश शिवारे मोकळी पडत असल्याने गव्यांसह रानडुकरांचे कळप अन्नाच्या शोधार्थ सपाटीच्या गावांकडे धाव घेत असून, शेतकऱ्यांच्या तोंडचे त्यामुळे पाणी पळाले आहे. शाळूची उभी शिवारे रातोरात आडवी होत असल्याने शेतकरी रडकुंडीला आले आहेत. दिवसागणिक नुकसानग्रस्त क्षेत्रात अधिकच वाढ होत चालली आहे. काल रात्री धामणी येथील सचिन वसंत नाचणकर, रमेश वसंत नाचणकर यांचे शाळूचे उभे शिवार रानडुकरांनी रातोरात आडवे केले. साधारणपणे २४ गुंठ्यांतील पीक रानडुकरांनी फस्त केले आहे. शाळूची कणसे फस्त करून ताटे चघळून टाकल्याचे दिसून येत आहे. तेथीलच श्यामराव पुजारी यांच्याही ज्वारीच्या पिकाचे रानडुकरांच्या कळपाने नुकसान केल्याचे सांगण्यात आले.
यंदा अतिपावसाने खरिपातील ज्वारीचे पीक हाताला लागले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व भिस्त रब्बी ज्वारीवर होती; परंतु वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे मळणी करून ज्वारी घरी येईल, याची शाश्वती वाटत नसल्याचे सचिन नाचणकर, रमेश नाचणकर व शेतकऱ्यांनी सांगितले.
----------
अशी आहे स्थिती...
---------
* डोंगरभागातील पडीक शेतीमुळे फटका
* रानडुकरे व गव्यांचे कळप सपाटीकडे
* शेतकऱ्यांच्या सर्व उपाययोजना फोल
* उभी पिके कळपाकडून रातोरात आडवी
* ज्वारी उत्पादनात मोठी घट येण्याची भीती
----------------------------
(फोटो)
26B08061
धामणी : रानडुकरांच्या कळपाने रातोरात आडवे केलेले नाचणकर यांचे ज्वारीचे पीक.
---------------------
राजेश पाटील.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan: शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी बातमी! कृषिमंत्र्यांनी विधान परिषदेत सांगितली तारीख; कर्जमाफीचा निर्णय कधी?

Jalgaon Gold Market : सोने-चांदीच्या भावात मोठी पडझड! चांदी तब्बल २४ हजारांनी स्वस्त, जळगावच्या बाजारपेठेत खळबळ

Gorai Bus Depot Python : मुंबईकरांनो सांभाळून! गोराई बस डेपोत शिरले दोन महाकाय अजगर; पाहा रेस्क्यूचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

Petrol Diesel Price Maharashtra : अमेरिका-इस्त्रायल, इराण युद्धाचा परिणाम; महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल -डिझेलचे दर घ्या जाणून

Maharashtra RTO Recruitment : सरकारी नोकरीची मोठी संधी ! राज्य परिवहन विभागात होणार तब्बल 'इतक्या' जागांवर मेगा भरती

SCROLL FOR NEXT