बिबट्या शाळेजवळ, कंपाउंडचे काय?
ढेबेवाडी भागातील शिक्षक- पालकांचा सवाल; सुरक्षेच्या उपाययोजनांची मागणी
ढेबेवाडी, ता. २५ : निवी (ता. पाटण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात काही दिवसांपूर्वीच बिबट्या आल्याने डोंगरपट्ट्यातील शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबरोबरच शाळांच्या कंपाउंडचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डोंगरभागात अनेक शाळा कंपाउंडने बंदिस्त नाहीत, काहीना कंपाऊंड आहे; पण ते मजबूत नाही, असेही चित्र आहे.
परिसरात बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डोंगर भागाबरोबरच सपाटीच्या गावातूनही बिबट्याचा संचार असून, अगदी भरवस्तीतही घुसून बिबट्या पाळीव प्राण्यांची शिकार करत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. ऊसतोडणीचा हंगाम सुरू असल्याने परिसरातील बिबट्याची आश्रयस्थाने नष्ट होऊ लागल्याने ते सैरभैर झाले आहेत. डोंगरपट्ट्यातील निवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात काही दिवसांपूर्वीच बिबट्या आल्याने डोंगरपट्ट्यातील शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबरोबरच शाळांच्या कंपाउंडचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डोंगरभागात अनेक शाळा कंपाउंडने बंदिस्त नाहीत, काहीना कंपाउंड आहे; पण ते मजबूत नाही, अशी परिस्थिती आहे. डोंगरभागात जवळपास माध्यमिक शिक्षणाची सुविधा नसल्याने काही शाळात पहिली ते आठवीपर्यंत वर्ग आहे. काही शाळा चौथीपर्यंत असून, जोडूनच अंगणवाड्याही आहेत. शाळांच्या इमारती गावापासून एका बाजूला असल्याने आणि परिसर झाडाझुडपांनी वेढल्याने वन्यप्राण्यांच्या उपद्रवाची टांगती तलवार विद्यार्थी- पालक आणि शिक्षकांच्या डोक्यावर आहे. विशेषतः डोंगर भागातील सरसकट शाळांना मजबूत कंपाउंड असणे गरजेचे असून, तशी मागणीही जोर धरायला लागली आहे.
--------------------
कोट
डोंगर भागातील अनेक प्राथमिक शाळांना कंपाउंड नाही. वन्यप्राण्यांचा संचार असल्याने व अनेक शाळांच्या इमारती गावापासून बाजूला लोकवस्ती नसलेल्या ठिकाणी असल्याने कंपाउंडसारख्या सुरक्षेच्या उपाययोजना करणे खूप गरजेचे आहे.
- मारुती ऊर्फ बाळू पाटील, माजी अध्यक्ष, वन व्यवस्थापन समिती, निवी
--------------------------
(चौकट)
तारा वाघिणीचीही दहशत
ढेबेवाडी विभागातील डोंगरपट्ट्यात बिबट्याचा उपद्रव जाणवत असतानाच आता त्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडलेल्या तारा वाघिणीच्या संचाराची भर पडली आहे. काही दिवसांपासून तारा वाघीण निवी, कसणी परिसरात फिरताना दिसून येत आहे. तिच्या गळ्यात असलेल्या कॉलर रेडिओद्वारे तिचे लोकेशन समजत आहे, शिवाय तिच्यावर देखरेख ठेवायला वन्यजीव विभागाचे पथकही सोबत आहे, तरीही जनतेच्या मनातील वाघिणीची भीती कायमच आहे.
------------------------
08038, 08039
१) निवी : प्राथमिक शाळेची इमारत गावापासून एका बाजूला आहे.
२) मारुती पाटील
------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.