पुणे

मशागत...

CD

डोंगराला आग लागली...
तान्हाजी बोऱ्हाडे

सूर्य जणू आग ओकतोय असा हा कडक उन्हाळा. वारा परागंदा झालेला. नांगरून पडलेली रिकामी शेतं आणि पार्श्वभूमीवर उन्हानं वाळवंटा सारखी झालेली रुक्ष वने. दिवसभर तापणाऱ्या रानात सायंकाळी कुठे तरी आग धुसमुसते. उजेडात दूरवरून तितकीशी तीव्रता न जाणवणाऱ्या आगीचे रूपांतर हळूहळू रानभर पसरणाऱ्या भयंकर वणव्यात होते. दूरवर सजीवसृष्टीला भस्मसात करणारी ती आग संवेदनशील मनालाही चटका देऊन जाते. जंगल म्हणजे केवळ झाडे नाहीत. त्या वृक्षराजीच्या आडोशाने धरत्रीच्या कुशीत राहणाऱ्या अनेक पशू, पक्षी, विविध कीटक - कृमी, गवत, अशा सगळ्या सजीवांचे गुण्यागोविंदाने नांदणारे गावंच जणू. अशा जंगलाला आग लागली की त्यात वृक्ष, वेली, गवत अशी सारी वनराई आगीत होरपळून जाते. झाडाझुडपांतील पाखरांची घरटी, घरट्यातील कोवळी चिलीपिली आणि स्वत:ला वाचवू न शकणारी अनेक पाखरे त्या आगीत भस्मसात होतात. हरिण, ससा यांसारखे रानात आंनदाने बागडणारे अनेक मुके जीव कायमचे शांत होतात. मृत्यूचे हे तांडव फक्त एवढ्यापुरतेच मर्यादित राहत नाही तर प्रदूषण, तापमान वाढ, मातीची धूप, यासारखे पर्यावरणावर परिणामही करते. त्याचबरोबर जंगलातली एक परिसंस्था नष्ट होते. एकमेकांवर अवलंबून असणारी अन्नसाखळी तुटते.
बऱ्याचदा जंगलातील आगी मानवनिर्मित कारणांनी लागतात, असे अनेक पर्यावरणीय अभ्यास सांगतात. विझवायची तसदी न घेतलेली बीडी, जंगलात टाकलेल्या काचेच्या बाटल्या, शेकोटीचे निखारे, शेतीसाठी गवत जाळणे, गायरानात गवत चांगले यावे म्हणून जुने गवत जळून टाकण्याची चुकीची परंपरा यासारख्या फार गांभीर्याने न घेतलेल्या गोष्टीच मोठ्या वणव्याला कारणीभूत होतात. आणि मानवाच्या बेफिकिरीमुळे संपूर्ण जंगल आगीत बेचिराख होऊन जाते. गरम भांड्याचा एखादा चटका बसल्यावर हळहळणाऱ्या माणसाला रानातील सारी जीवसृष्टी आगीत होरपळून जाताना काहीच नाही वाटत का? लहानपणी आमच्याकडे एक खेळ होता ‘डोंगराला आग लागली पळा पळा पळा..’ ज्याच्यावर राज्य आहे तो इतर मुलांना पकडायला धावायचा. जो हाती सापडेल त्याला स्पर्श करून आग लागलेला डोंगर म्हणून त्याला जागेवर उभा करायचा. मग इतर मुलांनी त्या मुलाकडे जाऊन त्या मुलाला पाणी म्हणत धक्का द्यायचा. मग तो मुलगा पुन्हा खेळात सहभागी व्हायचा. मनोरंजन आणि आनंदाचा भाग सोडला तर आग लागलेल्या डोंगराला पाणी देत त्याची आगीतून मुक्तता करण्याची ही प्रतीकात्मकता आज वास्तवात आणण्याची खरी वेळ आहे. जंगलात लागणारे वणवे रोखणे हे केवळ एकट्या वनविभागाची जबाबदारी नाही. एक संवेदनशील माणूस आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली प्रत्येकाचीही भूमिका महत्त्वाची आहे. मानवनिर्मित कारणांनी वनात आग लागणार नाही याची काळजी घेणे, लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी शासकीय यंत्रणेला मदत करणे, शाळा, गाव अशा अनेक पातळींवर याबाबत जागृती निर्माण करता येईल. प्रयत्न केले तर निश्चितच जंगलाला लागणाऱ्या आगीत होणारा संहार टाळता येईल.
................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anand Paranjpe Sharad Pawar Meeting : पक्ष प्रवेश एकनाथ शिंदेंच्या पक्षात, भेट घेतली शरद पवारांची; ठाणेकर आनंद परांजपेंच्या भेटीने चर्चांणा उधाण

'सिंगल फादर असल्यानं मुलीच्या मैत्रिणी घरी येत नाही' इमरान खान म्हणाला, 'त्यांच्या आई वडिलांना माझ्याकडे मुलींना पाठवायला भिती...'

Kalyan Crime: कल्याण रेल्वे यार्डात मुलीवर अत्याचार; आरोपीला काही तासांत अटक, मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला अन् काय घडलं!

Pune : शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा भीषण अपघात, फॉर्च्युनरची रिक्षाला धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

'बालिका वधू'च्या गहनाने १० रुपयांच्या वस्तूपासून बनवला ब्रँड; कमावतेय कोट्यवधी, तुमच्याही घरात असेलच, काय आहे ती वस्तू?

SCROLL FOR NEXT