वॉशिंग्टन, ता.१३ (पीटीआय) : अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर आणि वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे देशातील अनेक भागांतील पिण्याच्या पाण्याला धोका निर्माण झाला आहे. वणव्यांनंतर जळालेली झाडे आणि करपलेली वनस्पती यांमधील राख व सेंद्रिय पदार्थ नद्या आणि ओढ्यांमध्ये मिसळतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होतात.
नव्या अभ्यासांनुसार, देशातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमधील प्रदूषण दीर्घकाळ कायम राहू शकते. हवामान बदल आणि दुष्काळाची तीव्रता वाढविणाऱ्या ‘एल निनो’च्या अधिक प्रभावी हवामान घटनांमुळे अमेरिकेत मोठे वणवे लागण्याचे प्रमाण आणि वारंवारिता वाढली आहे. २०२६ मध्ये आतापर्यंत ६८ हजार १७९ वणव्यांमध्ये ९५ लाख एकरांहून अधिक (३८ लाख हेक्टर) क्षेत्र जळून खाक झाले आहे. डोंगरउतार आणि जंगलांमध्ये वणवे लागल्यानंतर पावसामुळे राख आणि सेंद्रिय पदार्थ वाहून ओढे-नाल्यांमध्ये मिसळतात. या जलस्रोतांमधूनच शहरांना आणि गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या शुद्धीकरण प्रकल्पांना पाणी मिळते. न्यू मेक्सिको राज्यातील लास व्हेगास शहरातील नागरिकांना २०२२ मध्ये ‘हर्मिट्स पीक-काल्फ कॅनियन या वणव्यामुळे गॅलिनास नदीचे पाणी दूषित झाल्यानंतर अनेक महिने पाण्याविना राहावे लागले. त्यानंतरच्या चार वर्षांत नागरिकांना बाटलीबंद पाणी पुरविणे आणि जवळच्या शहरांतून पाण्याच्या टाक्या आणणे, असे उपाय करावे लागले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.