KAL 
पुणे

लांबलेल्या पावसाचा वन्यजीवांना फायदा

सचिन लोंढे ः सकाळ वृत्तसेवा

इंदापूरच्या वनक्षेत्रात मुबलक गवत आणि पाणी उपलब्ध

कळस (पुणे) : पावसाळ्यानंतरच्या पावसाने एकीकडे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना, दुसरीकडे याच पावसाचा वनक्षेत्र व वन्यजीवांना फायदा झाला आहे. इंदापूर तालुक्‍यातील वनात लावलेल्या रोपांना या पावसामुळे जीवदान मिळाले आहे. तसेच, हिरवा चारा उपलब्ध झाल्याने "चिंकारा'चे कळप सर्रास दिसत आहेत.

तालुक्‍यात सुमारे 6 हजार 100 हेक्‍टर वनक्षेत्र असून,यात चिंकारा जातीची हरणे, ससे, लांडगे, कोल्हे, तरस यांसारख्या प्राण्यांबरोबरच, विविध पक्षी, सरपटणारे प्राणी आढळतात. यात चिंकारा हरणांची संख्या अधिक आहे. हरणासाठी वनक्षेत्रात हिरवे लुसलुशीत गवत मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे. आगामी काही दिवस हे गवत वन्यप्राण्यांना मिळणार आहे. या शिवाय वनक्षेत्रात वन्यजीवांच्या पाण्यासाठी 131 टाक्‍या बांधण्यात आल्या आहेत. टाक्‍यात पाणी उपलब्ध झाल्याने वन्यप्राण्यांचे वनाबाहेर येणेही कमी होणार आहे. या शिवाय शेतकऱ्यांना होणारा त्रास वाचणार आहे. गुराखी, मेंढपाळांचा वनातील प्रवेश रोखण्याचा प्रयत्न वन कर्मचाऱ्यांकडून होणे गरजेचे आहे.

तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे म्हणाले, ""वन व वन्यजीवांचे संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाकडून त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. विनापरवानगी वनात प्रवेश, वन्यजीवांच्या अधिवासाला धोका पोचेल, असे कृत्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.''

 
...म्हणून हरणांची संख्या सर्वाधिक
कळस गावचे ग्रामदैवत हरणेश्वर असल्याने ग्रामस्थांचे हरणांसोबत धार्मिक नाते जोडलेले आहे. या ठिकाणी हरणांना दैवत मानले जात असल्याने त्यांच्याकडून होणारे उपद्रव ग्रामस्थ सहन करतात. परिसरात हरणांना अभय मिळाल्याने चिंकारा हरणांची संख्या सर्वाधिक आढळून येते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT