Wildlife Forensic Laboratory sakal
पुणे

Wildlife Forensic Laboratory : पुण्यात वन्यजीव न्यायवैद्यक प्रयोगशाळा ; राज्यातील पहिलाच प्रकल्प

महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, कर्नाटक या राज्यांमधील पश्चिम घाटातील वन्यप्राण्यांच्या नमुन्यांचे विश्लेषण करण्यासाठी पुण्यात राज्यातील आणि पश्चिम घाट परिसरातील पहिली वन्यजीव न्यायवैद्यक प्रयोगशाळा उभारणीसाठी भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या पश्चिम प्रादेशिक केंद्रातर्फे हालचाली सुरू झाल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, कर्नाटक या राज्यांमधील पश्चिम घाटातील वन्यप्राण्यांच्या नमुन्यांचे विश्लेषण करण्यासाठी पुण्यात राज्यातील आणि पश्चिम घाट परिसरातील पहिली वन्यजीव न्यायवैद्यक प्रयोगशाळा उभारणीसाठी भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या पश्चिम प्रादेशिक केंद्रातर्फे हालचाली सुरू झाल्या आहेत. ही प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्यात आला असून याबाबत सकारात्मक विचार सुरू आहे, अशी माहिती भारतीय प्राणी सर्वेक्षणाच्या पश्चिम प्रादेशिक केंद्राचे प्रभारी अधिकारी आणि शास्त्रज्ञ डॉ. बासूदेव त्रिपाठी यांनी दिली.

भारतीय प्राणी सर्वेक्षणाच्या पुण्यातील पश्चिम प्रादेशिक केंद्राला ६५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. त्रिपाठी यांनी ही माहिती दिली. यावेळी केंद्रातील संशोधक डॉ. अपर्णा कलावटे, डॉ. एस. एस. तलमले उपस्थित होते. तस्करी प्रकरणातील कायदेशीर चौकशी असो वा संशोधनाच्या अनुषंगाने रहस्यमय गूढ उलगडणे असो यासाठी वन्यप्राण्यांच्या त्वचा, नखे आणि अन्य नमुने रासायनिक विश्लेषणासाठी संबंधित एजन्सीकडून न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले जातात.

संपूर्ण पश्चिम घाटातील वन्यप्राण्यांच्या अनुषंगाने अशाप्रकारे विश्लेषणाची जबाबदारी भारतीय प्राणी सर्वेक्षणाच्या पुण्यातील पश्चिम प्रादेशिक केंद्राकडे देण्यात येते. या केंद्रामार्फत वन्यप्राण्यांचे नमुने विश्लेषणासाठी कोलकता येथील भारतीय प्राणी सर्वेक्षणच्या मुख्य कार्यालयातील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. परंतु आता महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, कर्नाटक या राज्यातील वन्यप्राण्यांच्या नमुन्यांच्या विश्लेषणासाठी पुण्यात वन्यजीव न्यायवैद्यक प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

याबाबत डॉ. त्रिपाठी म्हणाले, ‘‘भारतीय प्राणी सर्वेक्षणाच्या पश्चिम प्रादेशिक केंद्रातर्फे ही प्रयोगशाळा स्थापनेसंदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला. याबाबत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय सकारात्मक विचार करत आहे. त्यामुळे पुण्यात राज्यातील आणि पश्चिम घाटातील पहिली वन्यजीव न्यायवैद्यक प्रयोगशाळा उभारली जाईल. त्यासाठी केंद्राच्या आकुर्डी येथील आवारात जागा देखील निश्चित केली आहे. केंद्र सरकारची मान्यता आल्यानंतर आधुनिक न्यायवैद्यक प्रयोगशाळा उभारली जाईल.’’

पश्चिम घाटातील जंगलांमध्ये अत्यंत दुर्मीळ असणारे, नामशेष होण्याच्या मार्गावर असणारे आणि नामशेष झालेल्या वन्यप्राण्यांसह अन्य जीवांचे नमुने संग्रही असावेत, म्हणून पश्चिम घाट प्राणी भांडार उभारण्याला केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने मान्यता दिली आहे. हे भांडार उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळणार आहे. या निधीतून लवकरच प्राणी भांडार उभारण्यासाठी नवीन इमारत बांधली जाणार आहे.

- डॉ. बासूदेव त्रिपाठी, प्रभारी अधिकारी,

पश्चिम प्रादेशिक केंद्र, भारतीय प्राणी सर्वेक्षण

आतापर्यंत केलेले महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्प...

  • महाराष्ट्रासह गोवा, गुजरात व कर्नाटक यांसह दादरा, नगर हवेली आणि दमण, दीव या केंद्रशासित प्रदेशांमधील ३० हजार जीवजंतूंचा अभ्यास

  • विविध प्राण्यांच्या ३७५ प्रजातींचे ७५०हून अधिक नमुने आणि त्यांचा अभ्यास

  • प्राण्यांचे डीएनए बारकोडिंग

  • नव्या प्रजातींचा शोध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: लोकेश राहुलचे शतक! भारताची मजबूत आघाडीच्या दिशेने वाटचाल, घरच्या मैदानावर ३२११ दिवसांनी सेंच्युरी

Sanjay Raut PC : रामदास कदमांचा धक्कादायक दावा, ठाकरे गटाने दिलं प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

बाबो! चहरची गोलंदाजी बिग बॉसच्या घरात दिसणार, दीपक चहरची खरंच एन्ट्री होणार? आवेजच्या एक्झिटनंतर शोमध्ये मोठा ट्विस्ट

Mumbai News: मुंबईतील तरुण समुद्रात अडकला... एका घड्याळामुळे कसा वाचला जीव? थरारक प्रसंग वाचा...

SCROLL FOR NEXT