पुणे

रेल्वेची वन दर्शन सहल

CD

जंगल सफारीसाठी ‘वनदर्शन’ची विशेष पर्यटन मालिका
आयआरसीटीसीकडून पाच सहलींचे आयोजन; पहिली फेरी १९ नोव्हेंबरपासून

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ८ : महाराष्ट्रातील वन्यजीव आणि जैवविविधतेचा अनुभव घेण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ (आयआरसीटीसी) आणि महाराष्ट्र वन विभागाच्या सहकार्याने ‘वनदर्शन – निसर्गाचा अनुभव घ्या, वन्यजीवांचा शोध घ्या!’ ही विशेष पर्यटन मालिका सुरू करण्यात आली आहे. पहिली सहल १९ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे.
या उपक्रमांतर्गत चार रात्री आणि पाच दिवसांच्या पाच सहली आयोजित करण्यात आल्या आहेत. मुंबईहून विदर्भ एक्स्प्रेसने (१२१०५) गुरुवारी प्रस्थान, तर गोंदिया येथून १२१०६ विदर्भ एक्स्प्रेसने रविवारी परतीचा प्रवास असे नियोजन आहे. पॅकेजनुसार प्रवासाचे प्रारंभिक आणि परतीचे स्थानक निश्चित केले जाणार आहे.
----------------------------
पॅकेजमध्ये संबंधित अटींनुसार पुष्टी झालेली रेल्वे तिकिटे आणि वन्यजीव सफारीचे परमीट उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रत्येक फेरीसाठी थ्री एसी आणि टू एसीचे प्रत्येकी सहा बर्थ उपलब्ध असतील. मर्यादित जागांमुळे वन्यजीवप्रेमी, छायाचित्रकार आणि कुटुंबांना या सहलीत सहभागी होता येणार आहे.
----------------------------
बुकिंग आणि चौकशी : आयआरसीटीसीच्या www.irctctourism.com या संकेतस्थळावर बुकिंग उपलब्ध आहे. काउंटर बुकिंग आणि अधिक माहितीसाठी ८२८७९३१८८६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Politics : "गोकुळचं दार मी उघडलं म्हणून..."; महायुतीच्या दोन बड्या मंत्र्यांवर सतेज पाटलांचा थेट प्रहार!

AI Hallucination: धक्कादायक! सरकारी आदेशातच चक्क सुप्रीम कोर्टाचे बनावट निकाल? मुंबई उच्च न्यायालयाने काय केले पाहा...

Diwali Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँकांना सुट्ट्यांची मेजवानी! महाराष्ट्रासह 'या' ३ राज्यांत राहणार बंद; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Rocket Firecrackers Ban: दिवाळीच्या उत्साहावर नियमांचं बंधन! मुंबईत रॉकेट फटाक्यांवर बंदी; महापालिकेचा मोठा निर्णय

Maharashtra Live News: अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये फटाक्यांच्या पैशांवरून झालेल्या वादातून रक्तरंजित हल्ला; एकाचा उपचारादरम्यान मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT