Anil-Nanaware
Anil-Nanaware 
पुणे

कोथरूड कचरा डेपोमधील मृत्यू झालेल्या त्या कंत्राटी कर्मचाऱ्याला न्याय मिळेल का?

सकाळवृत्तसेवा

कोथरूड - कोथरूडमधील कचरा डेपो रॅम्प येथे ड्रायव्हर म्हणून काम करणा-या अनिल शिवाजी ननावरे (वय ३३, रा. किष्किंधानगर) या कामगाराचा दोन दिवसांपूर्वी कामावर असताना हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला. कायम सेवेतील कर्मचाऱ्यांना सर्व लाभ मिळत असताना कंत्राटी कर्मचाऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडले जात असल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांतून नाराजीचा सूर दिसून येत आहे. महापालिका धोकादायक काम करून घेत असताना त्यांना पूर्ण संरक्षण देणेही गरजेचे असल्याने मृताच्या परिवाराला सर्वतोपरी मदत करण्याची मागणी कंत्राटी कामगारांतून होत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपल्या सहकाऱ्याचा मृत्यू झाल्याचे पाहून ननावरे यांच्या सोबत काम करणाऱ्या  सहकाऱ्यांना फार मोठा मानसिक धक्का बसला आहे. रॅम्पवर काम करणा-या कामगारांनी सांगितले की, महापालिकेचा एखादा कामगार मृत पावला, तर त्याला एक कोटी रुपयापर्यंतचे विमा संरक्षण दिलेले आहे.

कंत्राटी कामगारांसाठी काय सोय आहे, ही विषमता कोण दूर करणार. आमच्याकडून धोकादायक काम करून घेतात, पण आम्हाला मात्र कोणतेही संरक्षण वा हमी नाही. ननावरे यांच्या मागे पत्नी, दोन मुले व आई, वडील असा परिवार आहे. त्यांना न्याय मिळेल का? कोथरूड कचरा डेपो रॅम्पवर काम करणारे कामगार शुक्रवार, शनिवार व रविवार असे सलग तीन दिवस ‘बोंब मारो आंदोलन’ करुन सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी करत आहेत.

येथील कामगारांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी येथे एका कामगाराचा मृत्यू झाला होता, परंतु त्याच्या कुटुंबीयांना अजूनही काहीही आर्थिक भरपाई मिळालेली नाही. कंत्राटी कामगारांना १ जुलै रोजी अचानक कामावरून काढून टाकले होते. 

राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष विजय डाकले यांनी या संदर्भात आयुक्त कार्यालयाला निवेदन देवून महापालिकेसाठी काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

अनिल  ननावरे गेली तीन वर्षे आमच्या कंपनीमध्ये काम करत होते. त्यांची भविष्य निर्वाह निधी व विम्याची रक्कम कुटुंबीयांना मिळू शकते. मागे जो कामगार वारला होता, त्याचे कुटुंबीय आले नाही, त्यामुळे त्यांना भविष्य निर्वाह निधी वा इतर भरपाई मिळाली नाही. 
- हेरंब मारजकर, सुपरवायझर, स्वयंभू ट्रान्स्पोर्ट कंपनी

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: कुलदीप यादवचा राजस्थानला दुहेरी धक्का! एकाच षटकात दोन फलंदाजांना धाडलं माघारी

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT