पुणे

पुण्यातील पाणी पुरवठ्याबाबत मोठा निर्णय; आता पाणी...

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 6.84 टीएमसी पाणीसाठा जादा असल्याने आहे. परिणामी जुलैअखेर शहर आणि शेतीसाठी पुरेल एवढा पाणीसाठा असल्याने पाणी कपातीची शक्यता कमी आहे. याबाबतचा अंतिम निर्णय उद्या (शनिवार) होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होईल.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पाठोपाठ राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट आणि त्यानंतर झालेले सत्तांतर यामुळे कालवा समितीच्या बैठका झालेल्या नव्हत्या. राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीत कालवा समितीचे निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले होते. परंतु दरम्यानच्या काळात पाऊस आणि पाण्याची परिस्थिती चांगली असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या नाहीत.

जलसंपदा विभागाकडून उपलब्ध पाणीसाठा आणि पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात उपलब्ध पाण्याचे वार्षिक नियोजन झालेले नसल्याने आता तातडीने कालवा समितीची बैठक घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी मधून पुणे शहराबरोबरच हवेली, दौंड आणि इंदापूर या तालुक्यातील शेतीसाठी पाण्याचे आवर्तन दिले जाते. कालवा समितीच्या बैठकीमध्ये पुणे शहराला पिण्यासाठी आणि शेतीसाठी किती पाणी देणारा त्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत होणार आहे.

खडकवासला कालवा समितीची यंदाची पहिली बैठक उद्या माजी उपमुख्यमंत्री आणि आमदार अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात यावी. असे पत्र जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाला पाठवले आहे. उद्या शनिवारी खडकवासला सह उजनी कालवा समितीच्या बैठका देखील अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत.

धरणाचे नाव- पाणीसाठा (टीएमसी मध्ये)/टक्केवारी
खडकवासला- १.२४/ ६२.९२ टक्के
पानशेत- १०.५५/९९.१२ टक्के
वरसगाव- १२.४७/९७.३० टक्के
टेमघर- ०.६१/१६.५१ टक्के
आजचा एकूण साठा- २४.८८/ ८५.८८ टक्के
मागीलवर्षी- १८.०४/ ६१.८८ टक्के
जादा साठा- ६.८४/ २३.४८ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : एरंडोलमध्ये ८२ सार्वजनिक गणेश मंडळांकडून उत्साहात गणरायाची स्थापना

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT