solar eclipse
solar eclipse 
पुणे

अंधश्रद्धा न बाळगता सूर्यग्रहण पाहण्याची शपथ

सकाळ वृत्तसेवा

स्वारगेट : सूर्यग्रहणाकडे अंधश्रद्धा म्हणून न पाहता वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन पाहिले पाहिजे, असे आवाहन खगोलशास्त्रज्ञांनी संडे सायन्स स्कूल संस्थेतर्फे आयोजित "स्वागत सूर्यग्रहणा'चे या कार्यक्रमात केले. डिसेंबरमध्ये होणाऱ्या सूर्यग्रहणाबाबत रविवारी विद्यार्थी आणि पालकांमध्ये जनजागृतीसाठी आयोजित कार्यक्रमात हे आवाहन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व पालकांनी "आम्ही अंधश्रद्धा न बाळगता सूर्यग्रहण पाहू' अशी प्रतिज्ञा केली. 


पुढील महिन्यात कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे. 10 वर्षांनी असे ग्रहण होणार आहे. असे ग्रहण पाहण्याची संधी पुन्हा लवकर मिळणार नाही. म्हणून त्याबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इस्त्रोचे माजी संचालक डॉ सुरेश नाईक, खागोलशास्त्राचे अभ्यासक डॉ प्रकाश तुपे, प्रदीप लोखंडे उपस्थित होते. पुणे शहर व परिसरातील सुमारे एक हजाराहून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे पालक या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

लोखंडे म्हणाले,"" विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे काम केले पाहिजे. केवळ पाठांत्तर न करता सखोल वाचन केले पाहिजे.खेड्यातील विध्यार्थ्यांमध्येही आता खगोलशास्त्राबाबत मोठ्या प्रमाणावर आवड निर्माण होत आहे. मात्र ती आवड जपण्यासाठी ग्रामीण भागात वाचालनायची मोठ्या प्रमाणात गरज आहे.'' 

डॉ. नाईक यांनी चांद्रयान मोहीम 1 ,चांद्रयान मोहीम 2 ,त्याचबरोबर पीएसएलव्ही अग्निबाण मोहीम, तसेच सूर्याच्या संशोधनासाठी राबवलेली "आदित्य मोहीम' यावर सविस्तर माहिती दिली. 

डॉ तुपे म्हणाले, ""सूर्यग्रहणाकडे अंधश्रद्धा म्हणून न पाहता वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.26 डिसेंबरला होणारे सूर्यग्रहण पाहण्याची दुर्मिळ संधी आली आहे. त्यामुळे जास्ती जास्त नागरिकांनी ते पाहिले पाहिजे.'' कार्यक्रमाचे आयोजन सूयश डाके,दिनेश निसंग व निकिता कुलकर्णी यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT