sangavi 
पुणे

लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देणार-हर्षल ढोरे

रमेश मोरे

जुनी सांगवी (पुणे) : सांगवी व परिसरात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. समाजाला स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने समाज बांधवांना इतरत्र जावे लागते. येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी वर्षभरात प्रयत्न करणार असल्याचे नगरसेवक हर्षल ढोरे यांनी सांगवी येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने आयोजित शिवपुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा सांगता समारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

अनेक वर्षांपासून या समाजाची ही मागणी आहे. आजपर्यंत ती पूर्ण झालेली नाही. त्यांची स्मशानभूमीची मागणी ही रास्त असून आम्ही सर्व प्रभागातील नगरसेवक आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या सल्ल्यानुसार येत्या वर्ष भरात जुनी सांगवी येथे जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमास नगरसेविका माई ढोरे, शारदा सोनवणे, सिनेट सदस्य संतोष ढोरे, सुभाष ढोरे, नारायण ढोरे, सातारा मित्र मंडळाचे शिवाजी माने, वीरशैव लिंगायत समाज संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कानडे, सुरेश दंडवडे, संजय होनराव, माणिक धुरुपे, भीमाशंकर टोंगळे हे उपस्थित होते. या संस्थेचे सचिव सोमनाथ कोरे यानी प्रास्ताविक केले. कोरे म्हणाले, जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात लिंगायत समाजाची तीन हजाराच्या जवळपास लोकसंख्या आहे. अंत्यविधीसाठी येथील समाज बांधवांना मोरवाडी येथे जावे लागते.तेथेही पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने अडचणी येतात. सांगवी प्रभागातच जागा मिळाल्यास प्रश्न सुटेल. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रदीपकुमार देशमुख यांनी केले. तर महेश टींगरे, बळवंत हांचे, मधुकर खरोसे, अरुण शिंदे, अनिल जोतराव, अशोक देवणे, विजय केचे, साधना कोरे, संगीता धूरूपे, महादेवी दंडवडे, मंजुषा होनराव, भारत गणेशपुरे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंना राजकारणात येण्याची ऑफर कुणी दिली? एका दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तर काय करणार? काय म्हणाले मुंढे?

Raigad Heavy Rain : पाऊस आला धावून, अन् रस्ते गेले वाहून; रायगड जिल्ह्यात रस्ते व महामार्गांची दूरवस्था प्रवाशांचा जीव धोक्यात

IND vs ENG 3rd T20I: भारतीय संघाने टॉस जिंकला! ज्याच्यामुळे मागची मॅच हरली, त्याला केले संघाबाहेर; बघा कशी आहे Playing XI

Vasai Virar Local Stop : पावसापुढे रेल्वेची पुन्हा शरणागती; १२ तासांत दुसऱ्यांदा वसई-विरार लोकल ठप्प! लाखो प्रवासी अडकले

Nagpur Crime : ‘एआय’ तंत्रज्ञानाने शोधला निर्घृण मारेकरी; वृद्धेवरील अत्याचार व खुनाचा झाला उलगडा

SCROLL FOR NEXT