will send interested candidates report from Wagholi to manoj Jarange for Shirur Lok Sabha Sakal
पुणे

Shirur Lok Sabha : शिरूर लोकसभेसाठी वाघोलीतील इच्छुक उमेदवारांचा अहवाल जरांगे कडे पाठविणार

शिरूर लोकसभा मतदार संघात मराठा समाजाचा एक अपक्ष उमेदवार दिला जाणार आहे. त्या संदर्भात नुकतीच मराठा बांधवांची वाघोलीत बैठक झाली. इच्छुक उमेदवारांच्या नावांचा अहवाल मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : शिरूर लोकसभा मतदार संघात मराठा समाजाचा एक अपक्ष उमेदवार दिला जाणार आहे. त्या संदर्भात नुकतीच मराठा बांधवांची वाघोलीत बैठक झाली. इच्छुक उमेदवारांच्या नावांचा अहवाल मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. वाघेश्वर मंदिरात ही बैठक पार पडली.

लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाचा एक अपक्ष उमेदवार दिला जाणार आहे. त्याच संदर्भात वाघोलीतील सकल मराठा समाज बांधवांची बैठक पार पडली. मराठा आरक्षणासाठी लढणारे जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारांचे नाव जाहीर करण्यासाठी मराठा समाजाला गावागावात बैठका घेऊन अहवाल पाठविण्याचे आवाहन केले होते.

शिरूर लोकसभेतील तालुके तसेच इतर गावात बैठका घेऊन मराठा समाज बांधव इच्छुक उमेदवारांचे अहवाल जरांगे पाटील यांच्याकडे पाठविणार आहेत. जरांगे पाटील शिरूर लोकसभेसाठी जो उमेदवार जाहीर करतील त्या उमेदवाराचे काम करण्याचा निर्णयही यावेळी बैठकीत घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi UAE Visit: तेल, LNG-LPG आणि ५ अब्ज डॉलर गुंतवणूक अन्... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळालं?

Monsoon : मॉन्सून २६ मे पर्यंत केरळात दाखल होण्याचे संकेत

ITI Admission : ‘आयटीआय’च्या प्रवेशासाठी २१ मे पासून अर्ज प्रक्रिया होणार सुरू; राज्यात दीड लाखांहून अधिक जागा

IPS Officers Transfer: राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या; पुणे, नाशिकमध्येही मोठे फेरबदल, कुणाची बदली कुठे?

Who is Akash Maharaj Singh? ऋतुराज संजू, उर्विल यांना बाद करून खिशातून काढला कागद... काय लिहिलंय माहित्येय? Video Viral

SCROLL FOR NEXT