पुणे

वाघोलीत शाळेजवळच ‘दारूचा अड्डा’

CD

वाघोलीत शाळेजवळच ‘दारूचा अड्डा’
आव्हाळवाडी रस्त्यावरील स्थिती ः परवाना रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा

वाघोली, ता. २२ ः वाघोली-आव्हाळवाडी रस्त्यावर असणाऱ्या एका प्राथमिक शाळेजवळच वाइनशॉप असल्याने
परिसरातील नागरिकांना विशेषता महिलांसह मुलांना त्याचा त्रास होत आहे. प्रशासनाने संबंधित दुकानाची चौकशी करून नियमभंग आढळल्यास परवाना रद्द करून ते कायमस्वरूपी बंद करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे. यासंदर्भात दारूबंदी व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.

स्थानिक रहिवासी संदीप कटके यांनी सांगितले की, वाइन शॉपशेजारील इमारतीत शाळा असल्याने मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. दारूच्या नशेत पिणाऱ्यांचा तेथेच गोंधळ सुरू असतो. महिलांना ये-जा करताना असुरक्षित वाटते. मद्य घेण्यासाठी येणारे ग्राहक रस्त्यावरच बेशिस्तीने वाहने लावत असल्याने वाहतुकीला अडथळा होतो. अल्पवयीन मुलांना मद्यविक्री होत असल्याचा तसेच परवानाधारक नसलेल्या काही हॉटेल व ढाब्यांना मद्यपुरवठा केला जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
यासंदर्भात तातडीने कार्यवाही न झाल्यास दारूबंदी व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही कटके यांनी दिला आहे.
---------------------
संबंधित तक्रारीची माहिती घेऊन त्याची चौकशी करण्यात येईल. तपासादरम्यान काही त्रुटी अथवा नियमभंग आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
-अतुल कानडे, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT