विंगमध्ये श्रमसंस्कार शिबिरास प्रारंभ
मलकापूरच्या यशवंतराव मोहिते इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम
विंग, ता. २८ : मलकापूर (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरास विंग (ता. कऱ्हाड) येथे प्रारंभ झाला. दोन फेब्रुवारीअखेर चालणाऱ्या शिबिरात विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. स्वयंशिस्त आणि समाजसेवेची जाणीव, त्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच शिबिराचा मुख्य उद्देश असून, सुमारे ७० शिबिरार्थी त्यामध्ये सहभागी झाले आहेत.
दत्तक घर व घरासमोर रांगोळी, ग्रामस्वच्छता उपक्रमाने शिबिराला प्रारंभ झाला. शिबिरात विविध उपक्रम हाती घेतले आहेत. दंत तपासणी शिबिर, आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण, नेत्र तपासणी, जिल्हा परिषदेच्या विंग केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, पोवाडा, पद्यलेखन स्पर्धा, उखाणा, ओव्या, वक्तृत्व स्पर्धेसह ग्रामसर्वेक्षण क्षेत्रभेटी, पथनाट्य, लेझीम, झांजपथक यासह विविध क्षेत्रातील व्याख्यात्यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. प्राजक्ता बोत्रे, डॉ. शिवकुमार राजमाने, डॉ. अजित पवार, डॉ. विजय पवार, डॉ. अभय पांडेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप सूर्यवंशी, अॅड. गौरी पाटील व त्यांचे सहकारी शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत.
दोन फेब्रुवारीला सांस्कृतिक कार्यक्रम, बक्षीस वितरण व निरोप समारंभाने शिबिराची सांगता होईल. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत अधिकारी विकास पाटील उपस्थित राहतील, अशी माहिती कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिता पाटील व संचालक डॉ. अजीम शेख यांनी दिली.
शिबिराचे औपचारिक उद्घाटन सरपंच दीपाली पाटील, उपसरपंच संतोष कासार-पाटील, विकास माने यांच्या उपस्थितीत झाले. प्रशासकीय अधिकारी राहुल पाटील, यश पाटील, हर्षल मोहिते, अल्फीया मुल्ला, सृष्टी जाधव, सविता जाधव आदी परिश्रम घेत आहेत. योग प्रशिक्षक अपूर्वा लाटकर हे योगाचे प्रशिक्षण देतील. डॉ. अनिता पाटील यांनी प्रास्ताविक केले. रिया नांगरे यांनी सूत्रसंचालन केले. आसिया चौधरी यांनी आभार मानले.
------------------------
02163
विंग : येथील श्रमसंस्कार शिबिरातील स्वच्छता मोहिमेत सहभागी विद्यार्थी.
------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.