Wipro Covid19 will add more beds to the hospital CEO Bharat Shendge 
पुणे

विप्रो कोविड रुग्णालयात आणखी बेड वाढवणार; सीईओ भारत शेंडगे यांची माहिती

सकाळवृत्तसेवा

पुणे : जिल्हा परिषद आणि विप्रो कंपनीच्यावतीने हिंजवडी (ता. मुळशी) येथील विप्रो कोविड रुग्णालयांत आणखी १३९ बेड वाढविण्यात येणार आहेत. यामुळे येथील एकूण बेडची संख्या ४३९ होणार आहे. सध्या या रुग्णालयात २८९ कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्यावतीने या रुग्णालयांसाठी आज आणखी सहा वैद्यकीय अधिकारी, दोन विशेषतज्ज्ञ नव्याने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे या रुग्णालयातील डॉक्टरांची संख्या आता ८८ झाली आहे. यामध्ये सात एम. डी. डॉक्टर, १८ एम.बी. बी. एस आणि ६३ बी. ए. एम. एस. डॉक्टरांचा समावेश असल्याचे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात पूर्ण क्षमतेने हे रुग्णालय सुरू करण्यात आले होते. परंतु मध्यंतरीच्या कालखंडात रुग्णसंख्या कमी झाल्याने काही डॉक्टर कमी करण्यात आले होते. परंतु आता नव्याने पुन्हा डॉक्टरांच्या नियुक्त्या पूर्ववत करण्यात येत आहेत. यामुळे पुन्हा एकदा हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू केले जाणार आहे. असल्याचे शेंडगे यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांना चांगले उपचार मिळावेत, या उद्देशाने कोविड रुग्णालय सुरू केले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक रुग्णांनी येथे उपचार घेतले. या रुग्णालयात ऑक्सिजनची बेडची सुविधा उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT