case registered against NCP worker Marine Drive Police Station Mumbai crime police Sakal
पुणे

Pune Crime News : सासूने सोन्याचे दागिने घालू दिले नाहीत; चिडलेल्या सुनेने दिली सुपारी

या सुनेला आता अटक कऱण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

घरगुती वादातून एका महिलेने आपल्या सासूला मारण्यासाठी गुंड पाठवल्याची घटना पुण्यात घडली आहे. या महिलेला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार घरगुती वादातून केल्याचं समोर आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातल्या कोंढवा परिसरात दिवसाढवळ्या एका घरामध्ये काही अज्ञात व्यक्ती घुसल्या. त्यांनी या घरातल्या वृद्ध महिलेवर हल्ला केला. त्यांनी तिच्या सोन्याच्या बांगड्या आणि तिच्या सुनेची सोन्याची साखळी पळवली. त्यानंतर या वृद्ध महिलेने पोलिसांत तक्रार दिली.

हेही वाचा - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

त्या तक्रारीनुसार, पोलिसांनी एफआयआर दाख करून घेतला आणि या चोरीप्रकरणी तपासही सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी सुनेच्या काही स्टेटमेंट्सबद्दल शंका आली. त्यानंतर त्यांनी परिसरातले काही सीसीटीव्ही कॅमेरा तपासले. त्यात घटनेतल्या तीन व्यक्ती दिसल्या. या तीन व्यक्ती कर्नाटकातल्या गुलबर्गा इथल्या असल्याचंही तपासाअंती समोर आलं.

त्यानंतर पोलिसांनी या तिघांनाही अटक केली. कसीम नायकवडी, मेहबूबसाब बरदाजे, अब्दुल मुल्ला अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांच्या तपासानंतर पोलिसांना आढळून आलं की या तिघांनीही हा गुन्हा सुनेच्या सांगण्यावरुन केला आहे. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. सासूने सोन्याचे दागिने घालू न दिल्याच्या रागातून सुनेने हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant : न्यायाधीश हातात बॅट घेऊन उतरले! पण CJI ने दिलेला ‘तो’ संदेश सर्वांना थक्क करून गेला! देशभरात चर्चेचा विषय?

BCCI ने बंदी घातलेल्या Harry Brook ला काव्या मारनची फ्रँचायझी लिलावात ५.६५ कोटी देणार; मुंबई इंडियन्सची ३ खेळाडूंसाठी स्ट्रॅटर्जी

Latest Marathi News Live Update : ऊस दरासाठी शेतकरी आक्रमक; वाखरी येथे रस्तारोको, वाहतूक ठप्प

Viral Video : मालकाच्या मृत्युमुळे दु:खात बुडाला कुत्रा, प्रेताजवळ बसून ढसाढसा रडू लागला; व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

Recharge Plan : फक्त दोनच दिवस उरले! 251 वाली रीचार्ज ऑफर संपणार; दिवसाला 9 रुपये खर्चात 100GB डेटा अन् फ्री कॉलिंग, 100 SMS

SCROLL FOR NEXT