पुणे

पैशांचे आमिष दाखवून शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप दोन महिला, एक पुरुष आणि चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध राजूर पोलिसांत फिर्याद

CD

पैशांचे आमिष दाखवून महिलेचा विनयभंग
अकोले, ता. १२ : पैशांचा पाऊस पाडण्याचे आणि लाखो रुपयांचे दागिने देण्याचे आमिष दाखवून एका महिलेचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार राजूर येथे उघडकीस आला. या महिलेने या प्रकरणी दोन महिला, एक पुरुष आणि चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध राजूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांकडे दाखल फिर्यादीनुसार, संबंधित महिलेकडे ७ ऑक्टोबर रोजी दोन महिला आल्या. नवरात्रासाठी साड्या पाहण्याच्या बहाण्याने त्यांनी महिलेला सोबत येण्यास सांगितले, तसेच त्यातील एका महिलेच्या घरी पीडितेस नेले. तेथे काही अनोळखी व्यक्ती उपस्थित होत्या. त्यांनी पीडितेला वैयक्तिक व कौटुंबिक स्वरूपाचे प्रश्न विचारले, तसेच व्हिडिओ चित्रीकरण केले.
त्यानंतर महिलेला पैशांचा पाऊस पाडण्यासाठी पूजा करावी लागेल, पाच लाख रुपयांचे दागिने आणि नवीन कपडे दिले जातील, असे सांगण्यात आले, तसेच तिचा विनयभंग करण्यात आला.
या प्रकारानंतर संबंधित महिला घरी परतली. तिने पती आणि आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर तिने राजूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Rohit Pawar : एमपीएससी प्रशासनातील घोटाळा मुंढे बाहेर काढतील असा विश्वास

Water Supply : ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा! महापालिकेचे नवीन धोरण; सदनिकाधारकांना पाणी देणे बिल्डरला बंधनकारक

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा..

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

SCROLL FOR NEXT