Crime sakal
पुणे

Crime News : गांजा बाळगणारी महिला अटकेनंतर पोलीस ठाण्यातून पळाली

गांजा विक्रीबाबत माहिती मिळाल्यानंतर २५ एप्रिल रोजी रात्री उशिरा लोणीकंद पोलीसांनी छापा टाकून १ किलो ३२९ ग्रॅम गांजा जप्त केला.

सकाळ वृत्तसेवा

वाघोली - गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या महिलेला दाखल गुन्ह्यात अटक केल्यानंतर महिला पोलीस कर्मचारी कामात व्यस्त असताना नजर चुकवून तिने पोलीस लोणीकंद पोलीस ठाण्यातून धुम ठोकली. याबाबत पुन्हा तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथील गायरान वस्ती येथे होत असलेल्या गांजा विक्रीबाबत माहिती मिळाल्यानंतर २५ एप्रिल रोजी रात्री उशिरा लोणीकंद पोलीसांनी छापा टाकून १ किलो ३२९ ग्रॅम गांजा जप्त केला. गांजा बाळगणारी महिला छकुली राहुल सुकळे (वय २४, रा. वाघोली) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

रात्रीची वेळ असल्याने महिलेला अटक न करता तिला नोटीस देण्यात आली. २६ एप्रिल रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास महिलेस अटक करून अटकेबाबत नोंद घेण्यात आली. तिला महिला पोलीस कर्मचाऱ्याकडे ताब्यात देण्यात आले. दुपारी १२ च्या सुमारास त्या महिला पोलीस कर्मचारी सीसीटीएनएस कक्षामध्ये काम करीत असताना छकुली सुकळे ही नजर चुकवून पळून गेली.

ती पळून गेल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात व परिसरात शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. यानंतर पळून गेल्या प्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB Win IPL 2026 Final: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 'जेतेपद' राखले! असा पराक्रम करणारा तिसरा संघ, विराट कोहलीची Fastest Fifty

विधान परिषदेसाठी भाजपची ११ उमेदवारांची यादी जाहीर; प्राजक्त तनपुरेंनाही संधी, राजकीय चर्चांना उधाण

Dhananjay Deshmukh: बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप 'फुसका बार'; सीसीटीव्हीने उघड केला दोन्ही बाजूंचा बनाव

Suman Kalyanpur: भारतीय संगीतविश्वातील सुवर्णपान हरपले! ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीतविश्व शोकमग्न

IPL 2026 Final, RCB vs GT live: गतविजेत्या बंगळुरूने इतिहास रचला! मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, बनला पहिला संघ...

SCROLL FOR NEXT