suicide file pic 
पुणे

मुलाच्या डोळ्यांदेखत आईची आत्महत्या; रुग्णालयातील खिडकीतून टाकली उडी 

सकाळवृत्तसेवा

पुणे - खासगी रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी टाकून महिलेने आत्महत्या केली. ही घटना रास्ता पेठेत सोमवारी (ता. 23) पहाटे साडेचार वाजता घडली. तिने नैराश्‍यातून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्‍त केला. या रुग्णालयात महिलेचा 13 वर्षांचा मुलगा उपचार घेत होता. 

यासना मुकेश बकसाना (वय 36, रा. वानवडी), असे तिचे नाव आहे. समर्थ ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. पोलिस उपनिरीक्षक विशाल मोहिते यांच्या माहितीनुसार, यासना यांचा मुलगा गर्व (वय 13) याला चार वर्षांपासून मूत्रपिंडाचा विकार आहे. रविवारी रात्री डोके दुखत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर पाचव्या मजल्यावरील कक्षात उपचार सुरू होते. पहाटे खिडकीतून उडी टाकल्याने त्या रुग्णालयाच्या आवारात पडल्या. सुरक्षारक्षकांनी रुग्णालय प्रशासनाला ही माहिती दिली. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. 

नैराश्‍यातून आत्महत्या? 
यासना यांची आर्थिक स्थिती चांगली होती. पती-पत्नी काही वर्ष परदेशात नोकरीला होते. त्यांना 13 वर्षांचा मुलगा व पाच वर्षांची मुलगी आहे. त्यांच्या पतीचे कर्करोगाने तीन महिन्यांपूर्वीच निधन झाले. त्याचा त्यांना मोठा धक्का बसला होता. मुलाचे आजारपणही सुरू होते. यामुळे त्यांना नैराश्‍य आल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली. 

मी जाते...सॉरी ! 
यासना यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली. "माझ्या आत्महत्येस कोणाला जबाबदार धरू नये, माझी कोणाविरोधात तक्रार नाही. माझ्या मृत्यूनंतर आमच्या विम्याचे पैसे मुले मोठी झाल्यानंतर त्यांना द्यावेत. मी जाते... "सॉरी', असे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले. 

मुलगा मम्मी...मम्मी ओरडत होता 
मुलावर उपचार सुरू असल्याने यासना व त्यांची आई त्याच्याजवळच होत्या. पहाटे यासना खिडकीच्या दिशेने निघाल्या. तेव्हा, मुलगा मम्मी..मम्मी, असे ओरडून रडू लागला. त्यांनी मुलाच्या डोळ्यांदेखत उडी मारून जीवन संपविले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पुण्यातील चार दिवसांतील आत्महत्या 

शुक्रवार (ता.19) : सुखसागरनगर येथे दाम्पत्याची दोन लहान मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या 
शुक्रवार (ता. 19) : धायरीत मंडप व्यावसायिकाची नैराश्‍यातून आत्महत्या 
शनिवार (ता.20) : सहकारनगरला चप्पल विक्रेत्या तरुणाची आत्याच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या 
रविवार (ता. 21) : भवानी पेठेतील पद्मजी पार्क भागात सोसायटीतील नेपाळी सुरक्षारक्षक, दांपत्याची आत्महत्या 
रविवार (ता.21) : चांदणी चौकातील डुक्करखिंड टेकडीवरून उडी मारून महिलेची आत्महत्या 
सोमवारी (ता. 22) : खासगी रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून महिलेची आत्महत्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: "स्वतःच्या खात्याची माहिती नाही, उत्तर द्यायलाही भीती!" आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सभागृहावर बहिष्कार

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्ह्यातील शिंदेच्या शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त

IND vs IRE: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... संजू सॅमसन IN; आयर्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI

‘कोई मिल गया’ वीण दोघांतली…’मधील कलाकारांचा जबरदस्त डान्स, सोशल मीडियावर Viral Video

India Squad Change: भारतीय संघात मुंबईकर खेळाडूची एन्ट्री! श्रेयस अय्यरचा भिडू खेळाडू हार्दिक, नितीश कुमारची उणीव भरून काढणार

SCROLL FOR NEXT