पुणे

महिलेला दम लागत असल्याने नेले जात होते रुग्णालयात पण...

महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर : शिवापूर (ता.हवेली) येथे पुण्याहून आलेल्या एका 35 वर्षीय महिलेला शनिवारी (ता.16) दम लागत होता. या महिलेला पुण्यात ससून रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. या महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या महिलेच्या कोरोना चाचणीचा अहवाल आल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल, असे हवेली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी सांगितले.   

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संबंधित महिला ही पुण्यातील पिंपळे सौदागर येथून दोन दिवसांपूर्वी शिवापूर येथील नातेवाईकांकडे आली होती. रविवारी दुपारी तिला दम लागत असल्याने ती महिला शिवापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेली. मात्र, दम लागत असल्याने येथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्या महिलेला कुठून आलात, तुमचे घरात कोण कोण आहेत त्यांना बोलावून घ्या, त्यांना क्वारंटाईन करावे लागेल, असे सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संबंधित महिला तेथून निघून गेली. त्यानंतर या महिलेला जास्त त्रास होऊ लागल्याने तिला खेड-शिवापूर येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तेथेही तिला पुण्यातील दवाखान्यात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. पुण्यात उपचारासाठी नेत असतानाच वाटेत या महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे या महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत परिसरातील नागरिकांमध्ये धाकधूक वाढली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत हवेली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात म्हणाले, "या महिलेचे नमुने कोरोना चाचणीसाठी देण्यात आले आहेत. लवकरच त्या चाचणीचा अहवाल मिळेल. तोपर्यंत या महिलेच्या संपर्कात आलेल्यांना क्वांरंटाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: ते दोन चौकार त्याने लगावले नसते तर संजूच्या ९७ धावांची चर्चाच झाली नसती! गंभीरने भलत्याच खेळाडूचं केलं कौतुक, Video Viral

US-Iran War Impact: 'Strait of Hormuz' म्हणजे काय? भारतासाठी इतका महत्त्वाचा का? हा मार्ग बंद झाला तर महाग होईल तुमचं जेवण!

Viral Video : बँकेत पेन्शन घेताना वृद्धाला हृदयविकाराचा झटका, पैसे मोजण्याआधीच संपले जीवन, हृदयद्रावक घटना सीसीटीव्हीत कैद

Latest Marathi News Live Update : नागपूर कारखान्यातील स्फोट : जोपर्यंत युनिट बंद राहील, तोपर्यंत सर्व कामगारांना त्यांचे पगार मिळत राहतील -बावनकुळे

IND vs ENG : अभिषेकला बाकावर बसवणार, रिंकू सिंगला खेळवणार! इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीत भारताची Playing XI अशी असणार

SCROLL FOR NEXT