A woman crossing the road dies on the spot due to hit by dumper in Pimpri 
पुणे

पिंपरीत डंपरच्या धडकेत रस्ता ओलंडणारी महिला जागीच ठार

सकाळा वृत्तसेवा

पिंपरी : डंपरने दिलेल्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. 22) सायंकाळी चारच्या सुमारास नाशिक फाट्याजवळील भोसरी वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर घडली. धडक दिल्यानंतर डंपर रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर उलटला व त्यातील रेती रस्त्यावर पडली. यामुळे रस्ता बंद होवून वाहनांची दूरपर्यंत रांग लागली.

संजय राऊतांचे 'मिशन पुणे महापालिका' 

नाशिक फाटा येथील भोसरीकडे जाणाऱ्या बसथांब्यावरून एक महिला रस्ता ओलांडून पलीकडील बाजूला जात होती. त्यावेळी भोसरीहून नाशिक फाट्याकडे येत असलेल्या (एमएच 12, एफ झेड 9258) या क्रमांकाच्या डंपरने महिलेला जोरदार धडक दिली. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला.

सुर्यग्रहण पाहायचंय? मग, ही घ्या काळजी

धडक दिल्यानंतर डंपर रस्ता दुभाजकावर चढून विरूद्ध दिशेच्या रस्त्यावर उलटला. त्यामुळे त्यातील सर्व रेती रस्त्यावर पडून रस्त्यावरच रेतीचा ढीग लागला. त्यामुळे नाशिक फाटा उड्डाणपुलावरून भोसरीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक ठप्प झाल्याने दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.
प्रवाशांनो, पुणे- सातारा मार्गाने उद्या रेल्वे प्रवास करताय? वाचा महत्वाची बातमी

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांसह महामेट्रोची जलद कृती दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तातडीने अपघातग्रस्त डंपर बाजूला घेण्यासह रस्त्यावरील सर्व रेती उचलण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. 

पुणे-जबलपूर रेल्वे आता धावणार वर्षभर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT