Quarantine_Center 
पुणे

क्वॉरंटाईन सेंटरमधून बाहेर पडली अन् तिनं धरला घरचा रस्ता!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिवाजीनगर येथे क्वारंटाईन केलेल्या एका महिलेने शनिवारी (ता.१८) अचानक क्वॉरंटाईन सेंटरमधून पळ काढला. दोन कर्मचारी महिलेला थांबविण्याचा प्रयत्न करत असतानाही महिला थांबत नव्हती. अखेर विश्रामबाग वाहतूक शाखेच्या पोलिसांनी महिलेची समजूत काढत, रुग्णवाहिका बोलावून तिला पुन्हा क्वॉरंटाईन सेंटरमध्ये पाठवून दिले.

शनिवारी सायंकाळी साडे पाच वाजता विश्रामबाग वाहतूक शाखेचे सहायक पोलिस उपनिरीक्षक डी. जी. मार्कंडे आणि त्यांचे सहकारी अप्पा बळवंत चौक येथे कर्तव्य बजावत होते. त्यावेळी एक महिला आणि तिच्या पाठीमागे महापालिकेचे कर्मचारी अप्पा बळवंत चौकाकडे येताना दिसले. मार्कंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महिलेला अडविले, तिच्याकडे विचारणा केली. तेव्हा संबंधित महिलेवर अभियांत्रिकी महाविद्यालयातील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये उपचार केले जात होते. मात्र महिलेला पर्वती येथील तिच्या घरी जायचे होते, मात्र तेथून तिला सोडले जात नसल्याने ती शनिवारी सायंकाळी पाच वाजता तेथून बाहेर पडली.

त्यानंतर महापालिकेचे कर्मचारी तिला परत आणण्यासाठी तिच्या मागे धावत होते. थोड्या वेळातच महिला अप्पा बळवंत चौकात पोचली. त्यावेळी मार्कंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तिची समजूत काढली. तसेच रुग्णवाहिका बोलावून तिला परत केंद्रात पाठवून दिले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्यप्रदेशातून बंदुका आणून ५० हजारांत विकणारा सांगलीचा तरूण जेरबंद! मध्यप्रदेशसह माढा, पंढरपूर, सांगोला, आटणी तालुक्यातील ८ जण अटक, १७ गावठी बंदुका जप्त, वाचा...

Beed Municipal Council : बीड नगरपालिकेत ‘आपसातच’ जुंपली; ठरावातील फेरबदलावरून उपनगराध्यक्ष अन् सभापती भिडले

Banana Halwa Recipe: उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळलात? मग केळं, गूळ अन् ३ पिठांपासून बनवा भन्नाट ‘केळ्याचा हलवा’

आई-वडिलांच्या घरात राहून त्यांचाच छळ करता? मुलगा-सुनेला घराबाहेर काढण्याचा अधिकार पालकांना; सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट निर्वाळा

कृषी विभागाचा मोठा निर्णय! आता गावागावांत १५०० रुपये मानधनावरील शेतकरी मित्र; ३० टक्के पदे महिलांसाठी राखीव; राज्यात ११,५८७ शेतकरी मित्र नेमले जाणार

SCROLL FOR NEXT